अन्न व पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने म्हणजेच पाईप व पंप या घटकांसाठी लक्षांक अर्ज भरण्यात आलेले आहेत. तसेच कृषी विभागामार्फत असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक/जिल्हा अधीक्षक/कृषी अधिकारी/उपविभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे देखील विभागामार्फत सांगण्यात आलेले आहे.
सदर योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया-
- या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच त्यातील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.
- शेतकरी या योजनेसाठी अर्ज हा मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट ,सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र इत्यादी माध्यमाद्वारे संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
- ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंद करून घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक अधिकृत संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.
- त्याचबरोबर ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन त्याची नोंदणी करून घ्यावी. हा नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून घ्यावा व नंतर त्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
- असे तजे अर्जदार आहेत त्यांना अनुदान वितरित करण्याच्या अगोदर महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर महाडीबीटी पोर्टलवर युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे अर्ज करा असा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यातील सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसणारा बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर एक अर्ज ओपन होईल. त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे, जसे की मुख्य घटक या पर्यायांमध्ये सिंचन साधने व सुविधा या पर्यायाची निवड करायची आहे.
- बाबमध्ये पाईप/पंप सेट, इंजिन, मोटर हा पर्याय निवडावा. त्यानंतर उपघटक यामध्ये पाईप व मोटरसाठी विविध प्रकार पाहून पर्यायाची निवड करावी.
- पाईप व पंपासाठी योजनेच्या अटी व शर्ती मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये क्लिक करावे व जतन करा या बटणावर क्लिक करावे.
- जर तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असतील तर Yes या बटणावर क्लिक करावे. नसेल करायचा तर No या बटनावर क्लिक करावे. आपण फक्त पाईप व पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करावे. सूचना वाचून घ्या व ओके बटणावर क्लिक करावे. नंतर पहा या बटणावर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल जर तुम्ही एकापेक्षा अधिक योजनांसाठी अर्ज केलेले असतील तर योजनांना प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. तो द्यावा.
- त्यानंतर पाईप व पंप योजनेच्या अटी व शर्ती मान्य करून अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करावे.
- पाईप व पंपयासाठी अर्ज करताना तुम्हाला 23.60 एवढे रुपये भरावे लागणार आहेत. त्यासाठी Make Payment या पर्यावर क्लिक करावे.
- आता पेमेंट करण्याच्या पर्यायाची निवड करा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा. पेमेंत करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तुम्हाला त्यातील जो पर्यायसोपा वायटेल त्याची निवड करा व पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्यात पेमेंट करण्यासाठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे. त्यानंतर पेमेंटची पावती प्रिंट करून घ्यावी.
हेल्पलाईन क्रमांक- 022-49150800
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

