केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. आता या योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला 19वा हप्ता पाहिजे असेल तर काही महत्त्वाची कामे देखील पूर्ण करणे गरजेची आहेत. चला तर मग सदर लेखातून आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
शेतकरी नोंदणी गरजेची-
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी तसेच इतर कृषी योजनेच्या लाभासाठी शेतकरी नोंदणी ही गरजेची आहे. कृषी मंत्रालयाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना डिसेंबर 2024 पासून शेतकरी नोंदणी केल्याशिवाय देण्यात येणार नाही, असा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पाहिजे असेल तर शेतकरी नोंदणी करणे गरजेची आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करावी?-
नोंदणी करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यास upfr.agristack.gov.in या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यासाठी फक्त आधार कार्ड व ज्यावर ओटीपी येतो तो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्री UP व वेब पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करू शकतात. तसेच शेतकरी कोणत्याही सीएससी (कॉमन सर्विस सेंटर) मध्ये जाऊन देखील याची नोंद करून घेऊ शकतात. फक्त यासाठी आधार ओटीपी मिळवण्यासाठी त्यांच्याकडे आधाराशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. शेतकरी नोंदणीची अंतिम तारीख 31 जानेवारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 31 जानेवारीच्या अगोदर शेतकरी नोंदणी करून घ्यावी.
शेतकरी नोंदणी करण्याचे फायदे-
- योजनेच्या लाभासाठी शेतकरी नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच किसान सन्मान निधीच्या येणारा हप्ता मिळवण्यासाठी देखील गरजेची आहे.
- शेतकरी नोंदणी केल्यानंतर परत ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
- कोणत्याही कागदपत्रांशिवाय पात्रतेनुसार त्याच दिवशी डिजिटल KCC च्या माध्यमातून बँकेकडून जास्तीत जास्त 2 लाख रुपयांचे कर्ज देखील याद्वारे मिळू शकणार आहे.
- तसेच कृषी व कृषी संबंधित विभागाच्या सर्व योजनांच्या अनुदानाचा लाभ देखील मिळणार आहे.
- शेतकऱ्यांना यामुळे पीक कर्ज, पिक विमा भरपाई व आपत्ती निवारण मिळणे देखील यामुळे सोपे होणार आहे.
- किमान आधारभूत किमतीवरील खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच संस्थात्मक खरेदीदारांशी संपर्क करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळवता येणार आहे.
- शेतकरी नोंदणी व इतर अपडेट्स मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यास यामुळे मदत मिळणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

