लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला घेत असल्याचे पडताळणीमध्ये उघड झालेले आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत वारंवार विचारणा होत होती. त्यावर बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत खात्यात जमा होईल अशी माहिती दिली होती. परंतु प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी जवळ आला तरी हप्ता जमा होत नसल्याने नेमके काय झाले? याच विचारात लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता निर्माण होत होती. पण अखेर शुक्रवारी(ता.24) जानेवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत. तसेच ज्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्यांना देखील पैसे मिळतील. पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही हे कसे चेक करावे? आपण जाणून घेऊया.
खात्यात पैसे आले की नाही? कसे चेक करावे?-
- लाडकी बहीण योजनेचे पैसे हे थेट बँक हस्तांतरणद्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे जमा करण्यातयेतात. जर पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये जमा झाले असतील तर तुम्हाला मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. जर मेसेज आला नाही तर बँकेच्या ॲपमध्ये जाऊन तेथे डिटेल्स या पर्यायावर क्लिक करून खात्यात पैसे जमा झाले की नाही ते तुम्ही चेक करू शकतात. तसेच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे मिळालेले आहेत की नाही हे चेक करू शकता.
- त्याचबरोबर तुम्ही ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील पैसे जमा झाले की नाही हे स्टेटस चेक करू शकता. या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही अर्जदार लागेल या पर्यावरण करावे. त्या ठिकाणी अर्ज भरताना वापरलेला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस दिसेल. सर्वात शेवटच्या म्हणजेच डोळ्याच्या पुढच्या पर्यावर क्लिक केले की तुम्हाला समजेल तुम्ही आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत व ते कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत.
- ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत अॅपच्या माध्यमातून फॉर्म भरलेले आहेत त्यांना अजून या वेबसाईटवर स्टेटस पाहता येत नाही. त्यांना बँकेमध्ये जाऊन किंवा एसएमएसद्वारे किंवा बॅंकेच्या अॅपद्वारे पैसे जमा झालेले आहेत की नाही हे चेक करता येणार आहे. त्यांचे स्टेटस वेबसाईटवर दिसायला लागेल तेव्हा आपल्याला लेखातून त्याबद्दलची माहिती दिली जाईल.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

