उजनी धरणातून भीमा नदीत सोलापूरसाठी पाणी सोडले.
उजनी धरणातून शुक्रवारी भीमा नदीत 6000 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कारण की सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ सोसावी लागत आहे. त्यानुसार सुमारे पाच टीएमसी पाणी सोडण्यास येणार आहे. 20 मेपर्यंत हे पाणी सोलापूरच्या नजीकच्या औज बंधार्यात पोहचणार आहे. धरणातून सकाळी पहिल्या टप्प्यात दीड हजार व त्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने 6000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग …