महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्री सन्मान व स्त्रियांच्या हक्काच्या दृष्टीने शासनाच्याद्वारे नेहमीच कोणती ना कोणती भूमिका घेतली गेलेली आहे. घराच्या मालकीमध्ये महिलांच्या नावाची नोंदणी करून पती व पत्नी हे दोघेही संयुक्त मालक असावेत यासाठी महाराष्ट्रात मोहीम राबवली गेली आहे.
याच धर्तीवर राज्य शासनाच्या मार्फत सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे देखील नाव प्राधान्याने नोंदवले जावे यासाठी निर्णय घेतला गेला होता. याच निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सातबारा उताऱ्यावर देखील आईचे नाव नोंदवले जाणार आहे. 1 नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
भूमि अभिलेख विभागाचा प्रस्ताव नेमका काय आहे?-
महाराष्ट्रामध्ये 1 मे 2024 नंतर ज्यांचा जन्म झालेला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी केल्यास त्यांची नोंदणी करताना संबंधितांच्या आईचे नाव सातबाऱ्यावर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचवेळी वडिलांचे नाव देखील सातबारा उताऱ्यावर नोंदवणे बंधनकारक नसेल.
फेरफारवर देखील आईचे नाव नोंदवले जाणार?-
पुढील काळात फेरफार करण्यात आल्यास त्यावर देखील आईचे नाव लावले जाणार आहे. तर विवाहितांना वडिलांचे किंवा पत्नीचे नाव लावण्याची मुभा दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून भूमी अभिलेख विभागांना प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 1 मे 2024 पासून शासकीय कागदपत्रांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारण करण्यात आले होते. राज्य सरकारने चौथ महिला धोरण मार्च मंजूर केले होते. त्यानुसार शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले होते.
राज्य सरकारकडून महिलांसाठी विविध योजना?-
महाराष्ट्र सरकारद्वारे महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले आहेत. यामध्ये महिलांना एसटी मधून प्रवास करताना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे दरवर्षी 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी लखपती दीदी योजना देखील राबवली जाणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.