एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर यादरम्यान एका महिन्यासाठी हा दर लागू करण्यात आला होता. परंतु प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतीतील परिपत्रक सोमवारी (ता.14) रोजी काढण्यात आले आहे.
या निर्णयाचा फायदा सणसुदीमुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे अनेक कुटुंबे ही गावी जातात तर काहीजण पर्यटनस्थळांना भेट देतात. सलग सुट्ट्यांचा विचार करून एसटी महामंडळाद्वारे गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करण्यात येत असते. एसटीची 10 टक्के भाडे वाढ ही विठाई, शिवशाही, निमआराम बसेस यासाठी लागू होती. परंतु ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
मुंबई ते पुणे महामार्गावर शिवनेरीकरीत आभाडेवाढ लागू करण्यात आलेली नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आलेली आहे. राज्य परिवहन मंडळाला दररोज 23 ते 25 कोटी रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळत असते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पन्न 6 कोटी रुपयांनी वाढणे शक्य होते. परंतु राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे यंदा राज्याच्या तिजोरीतील हा पैसा कमी होणार आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.