मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतील काही महत्त्वाचे मुद्दे?

जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असून देखील तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे चेक करावे? व जर ते लिंक नसेल तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. 5 ऑक्टोबरपासून माझी लाडकी बहिणी योजनेच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे एकत्रित 3000 रुपये पात्र महिलांचा बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

तसेच ज्या महिलांचे अर्ज जुलै व ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत पण अजूनही त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे मिळून 7500 रुपये जमा करण्यात येत आहेत. जर तुमचा या योजनेसाठी अर्ज मंजूर झालेला असेल व तरीही तुमच्या बँक खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे.

तसेच मंगळवार (15 ऑक्टोबर) रोजी दुपारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या योजनेच्या संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे प्रतीक्षेतील महिलांच्या खात्यात 23 नोव्हेंबरनंतरच अनुदान जमा होणार आहे. तसेच आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. याबाबतीतील राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी बुधवारी (16 ऑक्टोबर) रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या व्हीसीवरील सभेत सूचना देण्यात आली आहे.

म्हणजेच याचा अर्थ असा की नव्याने अर्ज करणे व पुढील टप्पा याशिवाय त्रुटीत असलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेला मात्र आचारसंहितेमुळे आता ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला ब्रेक लागला आहे.

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यानंतर किती दिवसात पैसे जमा होतील?-

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक होण्यासाठी 48 तास लागतात. 48 तासानंतर नवीन माहिती अपडेट होते व तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असल्याचे दिसते. मग DBT द्वारे पैसे जमा करताना तुमच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे त्या बँका खात्यावर पैसे जमा केले जातात. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक झाल्यानंतर 3 दिवसांनी बँक खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतात.

परंतु हे लक्षात ठेवा की जेव्हा लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे, तेव्हाच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. उदा. जर समजा सरकारकडून 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी 10 ऑक्टोबर पूर्वी तुमचे बँक खाते आधारशी लिंक असले पाहिजे. जर या तारखेनंतर तुमचे आधार बँक लिंक झाल्यास पुढच्या हप्त्याच्या वेळी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *