जर तुम्हाला पुण्यात तुमच्या हक्काचे घर घ्यायचे असेल तर सुवर्णसंधी चालून आलेली आहे. मुंबईनंतर आता पुण्यात म्हाडातर्फे विक्रीची ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा संपूर्ण पुणे विभागांमध्ये वेगवेगळ्या लॉटरी आयोजित करून परवडणारी घरे उपलब्ध करून देते. या विभागातील घरे ही सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी चिंचवड व पुणे येथे आहेत.
आर्थिक दृष्ट्या कुमकवत वर्ग (EWS), LIG,MIG व HIG म्हणून वर्गीकृत केलेल्या सर्व उत्पन्नाच्या श्रेणी, स्वस्त गृहनिर्माण युनिट्समध्ये प्रवेश करू शकतात. अर्ज नोंदणी व अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी 10 ऑक्टोबर 20254 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. त्यामुळे म्हाडासाठी अर्ज कसा भरायचा, त्यासाठी वयोमर्यादा काय आहे, अर्ज भरताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
अर्जदारासाठी पात्रता काय आहे?-
- म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र व पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
- म्हाडामध्ये तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार विविध क्षेत्र श्रेणीतील घरांसाठी अर्ज करता येतो. अर्जदाराचे मासिक उत्पन्न 25,001 ते 50,000 रुपये पर्यंत असेल तर ती व्यक्ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकासाठी अर्ज करू शकतो.
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न 50,000 ते 75,000 च्या दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकासाठी अर्ज करता येणार आहे.
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उच्च उत्पन्न गट (एचआयजी) सदनिकांसाठी अर्ज करता येणार आहे.
- जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न रुपये 50,000 ते 75,000 रुपये दरम्यान असेल तर असा अर्जदार मध्यम उत्पन्न गट (MIG) फ्लॅटमध्ये अर्ज करू शकतात.
- जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न हे 75,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर असा अर्जदार उच्च उत्पन्न गट (HIG) फ्लॅटमध्ये अर्ज करू शकतो.
सदर लॉटरीचा अर्ज कसा भरावा?-
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी म्हाडाच्या housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर तेथे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. यासाठी रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील. युजरनेम नाव निवडा व पासवर्ड तयार करून दिलेल्या जागेवर भरा.
- नंतर त्यामध्ये तुमची सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
- सबमिट करण्याच्या आगोदर तुम्हाला तेथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तो भविष्यातील संपर्कासाठी वापरण्यात येईल.
सदर लॉटरीची आवश्यक कागदपत्रे?-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
म्हाडाचे आवाहन-
म्हाडाचे घर मिळवून देतो म्हणून याअगोदर अनेकांची फसवणूक झाली आहे. काहीनी तर म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. ते प्रकरण रोखण्यासाठी प्रशासनाने घरखरेदीदारांना आवाहन केले आहे की, सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. कोणत्याही व्यक्तीशी अर्जदारांनी परस्पर आर्थिक व्यवहार करू नका.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

