या तारखेला विधानसभेसाठी राज्यात होणार मतदान!

मंगळवारी (ता.15) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तकुमार यांनी दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर केल्याने महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम-

महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असून झारखंड विधानसभेची मुदत देखील 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. या अगोदर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यासह झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली होती. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होईल. 23 नोव्हेंबर या कालावधीत मतमोजणी व त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

झारखंड विधानसभेचा कार्यक्रम-

झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा 13 नोव्हेंबर व दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला होणार आहे. तसेच मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त माहिती देताना म्हणाले की काही दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्र व झारखंड या राज्यांना भेट दिली होती. तेव्हा तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास आम्ही केलेला होता. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हमध्ये 288 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. यासाठी 1 लाख 186 पोलिंग बुथ असणार आहेत. तर राज्यात एकूण 9.36 कोटी मतदार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी माहिती दिलेली आहे.

त्याचबरोबर जर झारखंड राज्याचा विचार करायचा झाला तर या राज्यात 24 जिल्ह्यातून 81 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. यातील 28 जागा एसटी प्रवर्ग व 9 जागा या एसटी प्रवर्गासाठी राखीव असतील . झारखंड विधानसभेचा कार्यक्रम 5 जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात 2.6 कोटी मतदार आहेत. यामध्ये 1.29 कोटी महिला तर 1.31 कोटी पुरुष मतदार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी सांगितले आहे.

उमेदवारी अर्जाची मुदत-

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत तर अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर पर्यंत होणारा आहे व 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज उमेदवार मागे घेऊ शकणार आहेत.

मतदारांसाठी सोयीसुविधा-

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांचे प्रचंड गैरसोय झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडून आल्याचे आयुक्त राजेश कुमार यांनी म्हटले आहे. त्यामुळे रांगेमध्ये खुर्च्या ठेवण्यात येणार असून प्राथमिक सुविधा देण्यात येतील. दोन किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्र असेल. 85 वर्षावरील मतदारांच्या घरी मतदान करून घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया गोपनीय असणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात येणार असल्याची माहिती राजेश कुमार यांनी दिलेली आहे. मतदारांना वोटर हेल्पलाईनवरून आपली सर्व माहिती मिळवता येऊ शकते. यामध्ये नाव, मतदान केंद्र आदीबाबतची माहिती मिळणार आहे.

अशी होणार मतदान प्रक्रिया-

  • महाराष्ट्र मतदान-

अर्ज दाखल- 22 ते 29 ऑक्टोबर

अर्ज छाननी- 30 ऑक्टोबर

माघारीची अंतिम मुदत- 4 नोव्हेंबर

मतदान- 20 नोव्हेंबर

मतमोजणी- 23 नोव्हेंबर

मतदार- 9 कोटी 66 लाख

मतदान केंद्र- 1 लाख 187

पुरुष मतदार- 4 कोटी 98 लाख

महिला मतदार- 4 कोटी 66 लाख

नवमतदार- 20 लाख 93 हजार

युवा मतदार- 1 कोटी 85 लाख

  • झारखंड मतदान-

मतदार- 2 कोटी 55 लाख 18 हजार 642

पुरुष मतदार- 1 कोटी 29 लाख 97 हजार 325

महिला मतदार- 1 कोटी 25 लाख 20 हजार 910

एकूण मतदारसंघ- 81

पहिला टप्पा- 13 नोव्हेंबर (43 जागा)

दुसरा टप्पा- 20 नोव्हेंबर (38 जागा)

नोटा- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *