आता विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत देण्यात येणारा अनुदान!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी व आदिवासी शेतकरी यांच्यासाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध बाबींसाठी अर्थसहाय्य केले जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून फक्त वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी इंधन विहीर 50 हजार रुपये आर्थिक मर्यादेत मंजूर केले जातात.

या योजनेची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत केली जाते. या योजनेची अर्ज स्वीकृती लाभार्थी निवडीपासून ते अनुदान देण्यापर्यंतची कार्यवाही महाडीबीटी पोर्टलद्वारे सुरू आहे. या योजनेचा लाभ  घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा खाली दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सदर योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष-

  • सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र अर्जदार शेतकऱ्याकडे असणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्याच्या नावाचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड व आधार संलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे.
  • किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6 हेक्टर शेत जमीन असणे गरजेचे आहे.
  • फक्त दुर्गम भागात 0.40 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी शेतकरी एकत्र येऊन या योजनेच्या लाभास पात्र असणार आहेत.
  • दारिद्र रेषेखाली लाभार्थ्यांनसाठी कमाल 6 हेक्टर क्षेत्राची शेतजमीनीची अट लागू करण्यात आलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून विविध घटकांच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश शासनाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयांमध्ये जाहीर केलेला आहे.

असे मिळणार अनुदान-

घटक – यापूर्वीचे अनुदान – नवीन अनुदान

  • नवीन विहीर – 2,50,000 – 4,00,000
  • विहीर दुरुस्ती – 50,000 – 1,00,000
  • इनवेल बोअरिंग – 20,000 – 40,000
  • विद्युत पंप संच – 20,000 – 40,000
  • वीज जोडणी आकार – 10,000 – 20,000
  • सोलर पंप – 30,000 – 50,000
  • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण – 1,00,000 – 2,00,000
  • ठिबक सिंचन संच – 50,000 – 97,000
  • तुषार सिंचन संच – 25,000 – 47,000
  • डिझेल इंजिन – 0 – 40,000
  • एचडीपीई / पीव्हीसी पाईप – 0 – 50,000
  • यंत्रसामुग्री (बैलचलित/ट्रॅक्टर चलित अवजारे) – 0 – 50,000
  • परसबाग – 0 – 5,000

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *