शासनाची प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील निम्न व मध्यमवर्गीय लोकांना परवडणाऱ्या घरांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.पण योजनेच्या काही महत्त्वाच्या अटींचे पालन केले नाही तर शासन या योजनेच्या माध्यमातून दिलेले अनुदानाची रक्कम देखील काढून घेऊ शकते. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे शासन पैसे परत काढून घेऊ शकते.
शासन या तीन कारणांमुळे पैसे परत काढून घेऊ शकते-
- कर्ज डिफॉल्ट होऊ देऊ नका-
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या गृह कर्जाचा नियमित भरणा केला असेल तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर लाभार्थ्याने कर्जाचे हप्ते वेळेवर नाही भरले व थकबाकी न भरल्यास सरकार अनुदान काढून घेऊ शकते. जर कर्ज डिफॉल्ट मध्ये असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर तर खराब होतोच. तसेच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी देखील मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे देखील गरजेचे आहे.
- घराचे काम मध्येच थांबवू नका-
ज्या वेळेस तुम्ही घर बांधण्याची किंवा खरेदी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करतात तेव्हाच तुम्हाला पीएम आवास योजनेच्या सबसिडीचा लाभ देण्यात येतो. लाभार्थ्याने कोणत्याही कारणास्तव घर बांधणीचे काम थांबवल्यास किंवा ते अपूर्ण राहिल्यास अनुदान काढून घेण्याचा अधिकार शासनाकडे आहे.
या मागचा मुख्य उद्देश आहे की ज्यांना घर बांधायचे किंवा खरेदी करायचे आहे अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळावा. अपूर्ण प्रकल्पांमुळे सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होते व ते नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळेच घराचे बांधकाम वेळेत पूर्ण होणे देखील गरजेचे आहे.
- घर रिकामी ठेवणे किंवा ते भाड्याने देणे-
गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबना राहण्यासाठी स्वतःचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळाल्यानंतर एखाद्या लाभार्थ्यांनी घर खरेदी केले, परंतु ते स्वतः त्या घरामध्ये राहत नसतील किंवा ते भाड्याने देत असतील तर या योजनेचा गैरवापर होत आहे असा विचार सरकार करते. अशा परिस्थिती सबसिडी काढून घेतली जाऊ शकते. लाभार्थ्यांने स्वतः घरात राहणे व त्यांचा वैयक्तिक वापर करणे बंधनकारक आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.