राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सरकारद्वारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सरकारने पहिल्या टप्पात सुमारे 2 हजार 399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली होती.
त्यानंतर आता राज्याची कायदा व सुव्यवस्था अबादीत राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्डसंदर्भातही सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने होमगार्डच्या मानधना जवळपास दुप्पट वाढ केलेली आहे. म्हणजेच होमगार्डसना मिळणारा पगार आता थेट दुप्पट झालेला आहे. त्यासाठी सरकारद्वारे 795 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे-
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील होमगार्डसच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय 1 ऑक्टोबरला घेण्यात आला होता. या संदर्भातील शासन निर्णय देखील काढण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. या अगोदर राज्य शासनाच्या माध्यमातून होमगार्डस यांना 570 रुपये मानधन देण्यात येत होते त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे, ते आता 1083 रुपये केल्याची माहिती ट्विट करत फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यातील होमगार्डसच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाचा लाभ राज्यातील 40 हजार होमगार्डना होणार आहे असा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच ही वाढ कर्तव्य भत्यांपासून ते भोजन भत्यांपर्यंत सर्व भत्त्यांमध्ये केली जाईल असे देखील सांगण्यात आले होते. या निर्णयानुसार राज्य शासनाकडून 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील होमगार्डचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंदर्भातील शासण निर्णय जारी करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार होमगार्डचे मानधन प्रतिदिन 570 वरून 1083 रुपये करण्यात आलेले आहे.
तसेच विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आलेली आहे. तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आलेला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 55 हजार होमगार्डसना मिळणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे. तर गेल्याच महिन्यात सुमारे 11 हजार 207 होमगार्डसची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.