हवामान आधारित पीक विमा योजनेच्या माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 51 महसूल मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना 43 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट होती. मे महिन्यात सलग पाच दिवस तापमान 45° पेक्षा जास्त होते. याचा केळी पिकाला मोठा फटका …