राज्यातील विजबिल थकलेल्या घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या महावितरण अभय योजनेस मुदतवाढ देण्यात आलेले आहे. ही अभय योजना वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडले गेलेल्या ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. परंतु अभय योजना 2024 ला आता ग्राहकांच्या मागणीमुळे 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली गेलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून वीजबिलाच्या थकबाकीवरील पूर्ण व्याज व विलंब आकार माफ केला जात असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आलेले आहे.
राज्यातील महावितरणद्वारे 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा ज्या ग्राहकांचा खंडित केला गेला होता त्यांच्यासाठी 1 सप्टेंबर पासून अभय योजना सुरू केली होती. या योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपणार होता. परंतु सदर योजनेस आता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे.
या योजनेच्या माध्येमातून आतापर्यंत राज्यातील 65,445 एवढ्या वीज ग्राहकांनी लाभ देण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्याकडून 86 कोटी रुपयांचा भरणा देखील झालेला आहे. या ग्राहकांचे 44 कोटी 35 लाख रुपयांचे व्याज तसेच विलंब आकारणी माफ केले गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकलेली बाकी रक्कम भरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. जर रक्कम नाही भरली तर कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आलेले आहे.
असा घेता येईल लाभ-
अभय योजनेचा लाभ ग्राहकांना महावितरणच्या wss.mahadiscom.in/wss/wss या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. तसेच महावितरणाच्या मोबाईल ॲपद्वारे देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. वीज ग्राहक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री नंबरवर फोन करून देखील याबद्दलची माहिती मिळवू शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित विज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येणार आहे. त्याच पत्यावर योग्य पुरावा सादर करून नवीन नावाने वीज कनेक्शन घेण्याची सुविधा देखील आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

