राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे. या सरकारमध्ये राज्याचा कारभार नव्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेला आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेले आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे असे आश्वासन दिले होते.
लाभार्थी महिलांकडून हे पैसे नेमके कधी मिळणार आहेत, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, व अर्जांची छाननी होणार आहे का? असे वारंवार विचारण्यात येत होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आगामी अर्थसंकल्पात आम्ही त्यावर विचार करणार आहोत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती.
महिलांना 2100 रुपये कधी मिळणार?-
मुंबईत आझाद मैदान येथे देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये त्यांना लाडकी बहीन योजनेचा वाढीव हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला गेला.
यावर बोलताना सर्वात अगोदर ते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत. तसेच महिलांना मिळणा लाभ 2100 रुपये करणार आहोत. अर्थसंकल्पाच्या वेळी त्याचा विचार आम्ही करणार आहोत. म्हणजेच आपले आर्थिक योग्य झाल्यानंतर आपल्याला ते करता येणार आहे असे फडणवीस म्हणाले.
अर्जाची छाननी केली जाणार का?-
महिलांना 2100 रुपये देण्यात येणार आहेत हे नक्की. आम्ही जी आश्वासने दिली आहे ती पूर्ण करणार आहोत. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील त्या आम्ही आधी करू. छाननीबद्दल बोलताना ते म्हणाले की जर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना याचा लाभ मिळेल. पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे, अशा तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत.
यावेळी उदा. देताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ देण्यात येत होता, असे समोर आले होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वतः समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत, असे देखील सांगितले होते व नंतर ही योजना स्थिर झाली. याच पद्धतीने लाडकी बहिणी योजनेच्या निकषाच्या बाहेर काही महिला असतील तर त्यांचा पुनर्विचार करण्यात येणार आहे.
या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हणाले. तसेच राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना आगामी अर्थसंकल्पानंतर वाढीव पैशाचा लाभ मिळणार आहे, असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ज्या महिला निकषाच्या बाहेर आहेत त्या महिलांची नावे रद्द केली जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार आहे?-
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 31 डिसेंबरच्या आत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
सदर योजनेचे नवीन अर्ज भरता येणार का?-
सदर योजनेचे सध्या स्थितीला नवीन कोणतेही अर्ज स्वीकारले जात नाहीत.
ज्या महिलांना सदर योजनेच्या माध्यमातून अजूनदेखील एकही रुपया मिळालेला नाही त्यांनी काय करावे?-
ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून एकही रुपया मिळाले नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांना या डिसेंबर महिन्याच्या हप्ताबरोबर मागील सर्व हप्ते एकत्रित मिळणार आहेत.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

