भारत सरकार वित्तीय व्यवहार मंत्रिमंडळ समितीद्वारे प्राप्तिकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ही घोषणा आयकर विभागाद्वारे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी व चांगले पॅन देण्यासाठी करण्यात आलेली आहे. अर्जदाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर क्यूआर कोड असलेले ई-पॅन कार्ड मोफत पाठवण्यात येते. अगोदरचे पॅन कार्ड क्यूआर कोडशिवायही वैद्य राहणार आहे. परंतु तरीसुद्धा तुम्हाला पॅन 2.0 ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या पॅन कार्ड वरील मोबाईल नंबर, ई-मेल आयडी व पत्ता अपडेटसाठी अर्ज करता येणार आहे.
पॅन 2.0 हा प्रकल्प करदात्यांच्या सुधारित डिजिटल अनुभवासाठी पॅन/टॅन सेवांच्या तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तनाच्या माध्य्मातून करदाता नोंदणी सेवांच्या व्यवसायिक प्रक्रियेच्या पुनअभियांत्रिकीकरणाचा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. हे सध्याच्या पॅन/टॅन 1.0 इको-सिस्टीमचे अपग्रेड आहे तसेच ते कोअर आणि नॉन-कोअर पॅन-टॅन प्रमाणीकरण सेवेचे एकत्रिकरण करणार आहे. पॅन 2.0 प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालीसाठी समान ओळखकर्ता म्हणून त्यांचा पॅनचा वापर करणे शक्य होणार आहे.
पॅन कार्ड क्यूआर कोड-
QR कोड हे नवीन वैशिष्ट्ये नाही परंतु ते 2017-18 पासून पॅन कार्डमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. पॅन 2.0 प्रकल्पाच्या माध्यमातून सुधारणांसह क्यूआर कोडशिवाय जुने पॅन कार्ड असलेल्या पॅनधारकांना सध्याच्या पॅन 1.0 इको-सिस्टिममध्ये तसेच पॅन 2.0 मध्ये क्यूआर कोडसह नवीन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे.
- क्यूआर कोड पॅन व पॅन तपशील प्रामाणित करण्यात मदत करतो.
- सध्या क्यूआर कोड तपशीलांच्या पडताळणीसाठी विशिष्ट क्यूआर रीडर अॅप्लीकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे.
- रीडर अॅप्लिकेशेनच्या माध्यमातून वाचल्यावर संपूर्ण तपाशी म्हणजे फोटो, स्वाक्षरी, नाव, वडिलांचे नाव / आईचे नाव व जन्मतारीख प्रदर्शित करण्यात येते.
पॅनकार्ड वरील मोबाईल नंबर, ई-मेल आयडी व पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस!-
पॅनकार्ड NSDL किंवा UTI पोर्टलद्वारे ऑनलाईन मोबाईल नंबर, ई-मेल आयडी व पत्ता घरी बसल्या अपडेट करता येतो.
1) NSDL पोर्टल वरून पॅनकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया-
- सर्वात अगोदर या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- त्यानंतर पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, जन्म दिनांक महिना/वर्ष व कॅप्चा टाकून सबमिट करावे.
- नंतर “Continue With e-KYC” या पर्यायावर क्लिक करावे.
- आधारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी तुमच्या आधारशी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर/ई-मेल आयडीवर ओटीपी पाठवला जाईल. तो टाकून सबमिट पर्यायावर क्लिक करावे.
- जर डेटाबेसनुसार दाखवलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अपडेट करायचा असेल तर Yes या ठिकाणी क्लिक करावे व नवीन मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ओटीपी टाकून अपडेट करायचा नसेल तर No या पर्यायावर क्लिक करावे आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर आधार कार्डवर दाखवलेला पत्ता चेक करावा व व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे.
- तुमचा अॅड्रेस अपडेट करण्याची विनंती यशस्वीरित्या स्वीकारली जाईल. त्यातील पोचपावती क्रमांक हा नोट करून ठेवावा. आयकर विभागाच्या माध्यमातून पुष्टी मिळाल्यानंतरच पत्ता अपडेट केला जाईल व त्यानुसार ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवला जाईल.
- पुढे जनरेट व सेव्ह प्रिंट या पर्यायावर क्लिक करावे व pdf फाईल मध्ये पत्ता अपडेट केलेली पोचपावती डाऊनलोड करावी.
2) UTI पोर्टल वरून पॅनकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया-
- सर्वात अगोदर या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- त्यानंतर आपला पॅनकार्ड नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी व डिजीलॉकर सेवेद्वारे किंवा आधार आधारित eKYC मोडद्वारे सुविधा निवडा व कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे.
- नंतर अर्जदाराला नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी येईल. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अस्तित्वात नसेल किंवा ओटीपी प्रमाणीकृत नसेल तर या सेवा UIDAI रेकॉर्डनुसार पत्ता अपडेट करण्याची सुविधा देणार नाहीत.
- UIDAI रेकॉर्डनुसार मिळालेला पत्ता अर्जदाराच्या पुष्टीकरणासाठी दाखवण्यात येईल.
- यशस्वी व्हवहारानंतर अर्जावर प्राप्तिकर विभागाच्या नोंदी अद्यावत करण्यासाठी प्रक्रिया केली जाईल. जे UIDAI रेकॉर्डनुसार पत्ता अपडेट करण्यासाठी इच्छुक नाहीत त्यांना पत्ता अपडेट करण्यासाठी बदल विनंती मोडद्वारे अर्ज करण्यासाठी विनंती करता येते.
- डाऊनलोड या बटनावर क्लिक करून pdf फाईल अपडेट सुविध्रेची पावती डाऊनलोड करावे.
- पॅन कार्ड धारकाने त्याच्या पॅन कार्डमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्याची विनंती केली नसेल तर नवीन पॅन कार्ड वितरित केले जाणार नाही.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

