काही महिन्यापासून उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव यासह शिरूर-हवेली या तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यात तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हल्ल्यांसारख्या दुर्घटना ही घडलेल्या आहेत. यावरील उपाययोजना म्हणून तातडीने बिबटे पकडण्यासाठी 300 पिंजरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वन विभाग अधिकारी महादेव मोहिते यांना दिलेले आहेत, अशी माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिलेली आहे. आमदार कटके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन सादर केल्यानंतर तातडीची बाब म्हणून विशेष बैठक मुंबई येथे शिरूर हवेली मतदार संघातील विविध मुद्द्यांबात घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी निर्देश दिले, त्यावेळी वनविभाग, महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या परिसरात बिबट्यांची संख्या अधिक आहे त्या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व विशेष पथके तयार करण्याच्या सूचना वन विभागास देण्यात आलेल्या आहेत. तसेच जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मेंढपालांना मोठ्या आवाजाच्या बदुकांसह विशेष तंबू देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा. त्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात येईल असे निर्देशही देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेले आहेत.
शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळणार-
मानवावर बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली व समस्या मांडण्यात आली. त्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले वन विभागाने बिबटे पकडण्यासाठी 300 पिंज पिंजऱ्यांची खरेदी करावी. त्याचबरोबर निवारा केंद्राची क्षमता तीन महिन्यात 100 बिबट्यांची करावी. तसेच महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा इत्यादी कामांना मंजुरी देण्याचे निर्देश पवार यांनी दिले असल्याचे कटके यांनी सांगितले आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

