आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्ताऐवज आहे. जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड वापरणे बंधनकारक आहे. आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच सिमकार्ड घेण्यासाठी व रेल्वे तिकिटासाठी देखील आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
तुम्ही लांबच्या प्रवासादरम्यान बाहेर हॉटेलमध्ये थांबता. अशा वेळेस हॉटेल रिसेप्शनवर आधार कार्डची मागणी केली जाते. परंतु हॉटेल व इतर ठिकाणी आधार कार्ड देणे कधी कधी धोकादायक ठरू शकते. आधार कार्डमध्ये वैयक्तिक माहिती असते. आधार कार्ड वरील माहितीद्वारे कोणीही बँकेच्या संदर्भातील गोपनीय माहिती मिळवू शकतो. इतकेच नाही तर कोणीही आपल्या आधार कार्डचा गैरवापर करू शकतो.
तुम्ही जर हॉटेल व अन्य ठिकाणी आधार कार्ड देत असाल तर तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. ओळखपत्र म्हणून आधार कार्डची झेरॉक्स प्रत देण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ओरिजनल आधार कार्डसाठी मोफत पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. याबाबत सर्वसामान्यांना फार माहिती नाही. हॉटेल व अन्य ठिकाणी जेथे आधार कार्डची गरज भासते तेथे झेरॉक्स देण्याऐवजी मास्क आधार कार्ड देऊ शकता. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया मास्क आधार कार्ड म्हणजे काय?
मास्क आधार कार्ड म्हणजे काय?-
आधार कार्डवर आपले नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार क्रमांक असतो. परंतु मास्क आधार कार्डवर 12 पैकी 8 अंक हे लपवलेले असतात. यामुळे आर्थिक फसवणुकीचा धोका टाळता येतो. त्यामुळे अनोळखी ठिकाणी मास्क आधार कार्ड वापरणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
मास्क आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?-
- मास्क आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- त्यानंतर ‘My Aadhar’ या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती भरावी व नंतर कॅप्चा भरावा.
- त्यानंतर आधारबरोबर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन करावे लागेल.
- व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डाऊनलोड हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्हाला मास्क आधार पाहिजे का? या ठिकाणी क्लिक करावे.
- अशा प्रकारे तुम्हाला मास्क आधार कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. या मास्क आधार कार्डचा तुम्ही अनेक ठिकाणी वापर करु शकता.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.