राज्यामधील रब्बी हंगाम 2024 ची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपच्या माध्यमातून पीक नोंदणी करायची आहे. 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करता येणार आहे.
रब्बी हंगामातील पिक पाहणी-
- शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी- 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025
- सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी- 16 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
सर्वात अगोदर शेतकरी स्तरावरून मोबाईल अॅपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी नोंद करण्यात येणार आहे व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहाय्यकांद्वारे उरलेल्या शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदवली जाणार आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्वेमध्ये गटाच्या हद्दीत आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा की जोपर्यंत संबंधित शेतकरी निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही म्हणजेच पिकांचे फोटो काढत नाही तोपर्यत पीक पाहणी अपलोड करता येणार नाही.
Geo Fencing बंधनकारक असल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन गाव नकाशे अद्यावत असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. शेतकरी स्तरावर नोंदणी करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी पैकी 10% तपासणीचा अधिकार ग्राम महसूल अधिकारी यांना देण्यात आलेला आहे. 10% ई-पीक पाहणी तपासणी करण्याची जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी यांची असणार आहे. शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर 10% तपासणी प्रलंबित असलेले ई-पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांना तपासता येणार नाही.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.