पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय? सर्वसामान्य माणसांना याचा कसा फायदा होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवीन क्यूआर कोड आधारित पॅन कार्ड जारी करण्यासाठी 1,435 कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा उद्देश पुढील वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या पॅन जारी करण्याच्या विद्यमान प्रणालीला पुढे नेण्याचा आहे. पॅन 2.0 या प्रकल्पांतर्गत क्यूआर कोड आधारित प्रगत प्रणाली सुरू केल्याने बनावट कार्ड काढून ओळखणे सोपे होणारा आहे.

तसेच करदात्यांकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असू शकणार नाहीत. इतकच नाही तर नवीन पॅन कार्डनुसार फसवणूक करणे खूप अवघड होणार असून सर्वसामान्यांना त्यापासून संरक्षण मिळणार आहे. ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड असणार आहे ते देखील वैद्य राहणार आहे. पॅन कार्ड धारकांना क्यू आर कोड असलेले नवीन पॅन कार्ड मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परंतु प्रिंट हवी असल्यास त्यासाठी रक्कम मोजावी लागणार आहे.

क्यू आर कोड असलेल्या पॅन कार्डच्या प्रिंटसाठी किती रक्कम भरावी लागणार आहे?

जर पॅन कार्डमध्ये माहिती अपडेट करायची असेल किंवा दुरुस्त करायची असेल तर त्या सेवा मोफत असणार आहेत. ई पॅन कार्ड संबंधित कार्डधारकाला ई-मेल आयडीवर पाठवले जाणार आहे. पॅन कार्डची प्रिट ह्वी असेल तर संबंधित कार्डधारकाला 50 रुपये शुल्क भरावा लागेल व अर्ज दाखल करावा लागणार आहे. भारताबाहेर पॅनकार्ड पाठवायचे असल्यास 15 रुपये अधिक भरावे लागणार आहेत.  

क्यू आर कोड नसलेल्या पॅन कार्ड धारकांना अद्यावत प्रणालीच्या माध्यमातून नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागणार नाही. फक्त ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांना काही बदल करायचे असल्यास म्हणजेच ईमेल, मोबाईल क्रमांक, पत्ता, नाव व जन्मतारीख यासारख्या गोष्ट अपडेट करायच्या असतील तर पॅन कार्ड 2.0 प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर मोफत करता येणार आहेत.

पॅन 2.0 प्रकल्प सुरू करण्याचे कारण?

सध्या स्थितीला पॅन कार्ड संदर्भातील सेवा ह्या वेगवेगळ्या तीन पोर्टलवर उपलब्ध आहेत. नवीन प्रकल्पामध्ये पॅन 2.0 पॅन कार्ड व टॅन एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. तसेच आधार पॅन लिंकिंग करणे, पॅन व्हेरिफिकेशन करणे, ई पॅन कार्डसाठी विनंती करणे व पॅन कार्ड प्रिंटिंग करणे अशा इतर प्रक्रिया एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत.

इन्स्टंट वेरिफिकेशनची सुविधा-

आयकर विभागाने सांगितले आहे की ज्या लोकांकडे अगोदरचे पॅन कार्ड असेल त्यांनी नवीन कार्डसाठी अर्ज करणे बंधनकारक नाहीये. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या पॅन कार्डमध्ये काही सुधारणा किंवा अपडेट करायचे असेल तर अशा लोकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. नवीन अपडेट केलेल्या पॅन कार्डमुळे फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर नवीन पॅन कार्डच्या माध्यमातून इन्स्टंट व्हेरिफिकेशन मिळणार आहे.

सर्वसामान्यांना संरक्षण कसे मिळणार आहे?-

नवीन पॅन कार्ड हे क्यूआर कोडसह येणार आहे. त्यामुळे डुप्लिकेट कार्ड तयार करणे किंवा त्यात छेडछाड करणे खूप अवघड होणार आहे. क्यूआर कोडमध्ये एन्क्रिप्टेड पर्सनल डेटा असतो, जो फक्त एखाद्या विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करून अधिकृत लोकांनाच पाहता येऊ शकतो. त्यामुळे नवीन कार्डमधला तपशील काढणे फसवणूक करणाऱ्यांना खूप अवघड जाणार आहे.

तसेच आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोकाही कमी होणार आहे. सामान्यतः फसवणूक करणारे लोक हे आपल्या पॅन कार्ड वरील नाव किंवा फोटो बदलत असतात पॅन क्रमांक तसाच राहतो. पॅन कार्डवरील क्यूआर कोडमुळे वित्तीय संस्थांना तुमच्या वैयक्तिक माहितीची लगेच पडताळणी करता येऊ शकणार आहे.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *