आता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड प्रमाणेच 12 अंकी अपार कार्ड बनवले जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशील व इतर नोंदी केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर हे ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ म्हणून देखील वापरले जाणार आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला या अपार आयडी कार्डमुळे स्वतंत्र ओळख क्रमांक व सोबतच डिजिलॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा उपक्रम ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
अपार आयडी म्हणजे काय?-
याला ‘ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ असे देखील म्हटले जाते. अपार कार्डच्या माध्यमातून देशातील पूर्व प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 12 अंकी कायमस्वरूपी ओळखक्रमांक मिळणार आहे. सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद ही ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ म्हणजेच ‘यू-डायस’ पोर्टलमध्ये नोंदवलेली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांकपीईएन) नोंदणी आहे. आता अपार आयडी हे या पीईएनची जागा घेणार आहे.
अपार आयडी कार्डचा फायदा काय?-
- विद्यार्थ्यांना एका शाळेमधून दुसऱ्या शाळेत दाखला घेण्यासाठी तसेच देशातील कोणत्याही महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी अपार आयडी कार्डचा डेटा वापरता येणार आहे. अपार आयडीच्या 12 अंकांच्या आधारे त्याचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.
- अपार आयडी कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ट्रॅक होणार आहे म्हणजेच विविध परीक्षा शुल्क भरणा केलेले, उत्तीर्ण परीक्षा झालेले ट्रॅक होणार आहे. तसेच या अपार आयडी कार्डच्या माध्यमातून 12 अंकी क्रमांक आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
- या अपार आयडी कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळण्यासाठी हे कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवत आहे.
- अपार कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
- सरकारकडे माहिती जमा झाल्यानंतर सरकार गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक व वह्यांचे वाट्प करणार आहे. म्हनजेच त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येणार आहे.
- विद्यार्थी, पालक यांचे आधार कार्ड व त्याला पॅन कार्ड जोडणी केल्यानंतर गरजू व आर्थिकदृष्ट्या कुमकत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देण्यात येणार आहे.
- यापुढे विद्यार्थ्यांचे बँकेतील खाते उघडण्यासाठी आधार कार्ड व अपार आयडी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होणार आहे.
- जर विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड व अपार कार्ड सलंग्न असेल तर त्या विद्यार्थ्यांना सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ या खात्यात जमा होणार आहे. तसेच त्याना मिळणार्या पुरस्काराची रक्कम, विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम या खात्यात जमा होणार आहे.
- सरकारी विद्यार्थी असतिगृहात व विविध खाजगी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी आधार व अपार कार्ड महत्त्वाचे असणार आहे. त्या आधारे सवलत मिळणार आहे.
- देशभरात शैक्षणिक सहल आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या या माहितीचा उपयोग केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.
- सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळतीचे प्रमाण, त्यामागील कारण, शिक्षकांची संख्या व जेथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून बोगसगिरी सुरू आहे ते सर्व प्रकार या नवीन अपार कार्डमुळे समोर येणार आहेत. ज्या ठिकाणी पटसंख्या नसताना शिक्षकांची नियुक्ती, अतिरिक्त शिक्षक, शिक्षकांची गरज या सर्वांची बेरीज समोर येणार आहे.
अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’-
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यातील 65(31%) लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याकरता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
केंद्रशासनाचे निर्देश विचारात घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा अनुषंगाने दि. 29 व 30 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये अपार दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी अपार आयडी बनवण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरून अपार आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना देण्यात येणार आहेत.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.