पिकविम्याचे स्टेटस आता व्हाट्सअ‍ॅपवर पाहता येणार!

पिकविम्याच्या बाबतीतील कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी आता कुठेही जायची गरज नाही किंवा कोणत्याही वेबसाईटवर लॉगिन करण्याची गरज नाही. कारण आता पिक विमा स्टेटस आपल्या व्हाट्सअ‍ॅपवर चेक करता येणार आहे. PMFBY च्या माध्यमातून आता व्हाट्सअप चॅट बोट चालू करण्यात आलेले आहे. यासाठी एक नंबर प्रकाशित करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती.

पिकविम्याचे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपवर कसे चेक करावे?-

  • सर्वात अगोदर 7065514447 हा नंबर आपल्या संपर्क यादीमध्ये जतन करावा.
  • त्यानंतर आपल्या मोबाईलमधील व्हाट्सअ‍ॅप उघडावे व सेव केलेला नंबर काढावा.
  • त्या नंबरवर Hi असा मेसेज पाठवावा. त्यानंतर लगेच PMFBY चा रिप्लाय येईल.
  • आलेल्या रिप्लायमध्ये आपल्याला पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी व सी ऑल ऑप्शन्स असे पर्याय दिसतील.
  • सी ऑल ऑप्शनवर क्लिक केले की इतर सर्व पर्याय दिसतील. (यामध्ये पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस इंटीमेशन स्टेटस, क्लेम स्टेटस इत्यादी) पर्याय दिसतील.
  • यातील एक उदाहरण चला तर मग पाहूया. जर तुम्ही पॉलिसी स्टेटसवर क्लिक केले तर तुम्हाला परत रिप्लाय येईल.
  • यामध्ये रब्बी 2024, खरीप 2024 किंवा इतर पर्याय दिसतील.
  • यानंतर आपण पुढील पर्यायांमध्ये 2021 पासून ते 2024 पर्यंत रब्बी किंवा खरीप हंगामातील सर्व स्टेटस पाहता येतील.
  • यामधील कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित पिक विमा अर्जाची माहिती उपलब्ध होईल.
  • अशा पद्धतीने आपण खरीप किंवा रब्बी हंगामातील पीक विम्याची स्थिती व्हाट्सअ‍ॅपवर पाहू शकता.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *