सरकारी कामांसाठी आधार कार्डया कागदपत्राचा वापर केला जातो. परंतु कधीकधी निष्काळजीपणामुळे आधार कार्ड हरवले जाते. इतकेच नाही त्यावरील 12 अंकी नंबरही लक्षात नसतो. मग अशावेळी आधार कार्ड व 12 अंकी नंबर कसा मिळवायचा हा प्रश्न पडलेला प्रश्न पडतो. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. आधार कार्डचा वापर सर्व सरकारी कामासाठी केला जातो. आधार कार्डवरती व्यक्तीचे नाव, पत्ता व जन्मदिनांक दिलेला असतो. आधार कार्ड एकदाच बनवता येते.
त्यामुळे आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत. आधारकार्ड वरील दुरुस्ती करण्यासाठी किंवा आधार कार्ड खराब झाले असेल तर ते नव्याने काढण्याची सुविधा आहे, परंतु हे आधार कार्ड फक्त आधार क्रमांकाने तयार करता येते. नवीन आधार नंबर ने आधारकार्ड तयार करता येत नाही. पण समजा तुमचे आधारकार्ड हरवले व तुम्हाला त्यावरील 12 अंकी नंबर देखील लक्षात नसेल तर अशावेळी नेमकं काय करावे? याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड बनवताना त्या व्यक्तीचे फिंगर प्रिंट्स व आयरिस स्कॅन केले जातात. तसेच सदर व्यक्तीचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी त्यावर रजिस्टर केला जातो. त्यामुळे आधारकार्ड हरवले तर मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीच्यामाध्यमातून तुम्ही आधार नंबर मिळवून नवीन आधार कार्ड देखील काढू शकता.
या खालील स्टेप्स फॉलो करा-
- सर्वात अगोदर uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- त्यानंतर Aadhaar Services यावरती क्लिक करुन त्यामधील Retrieve Lost or Forgotton EID/UID या पर्यायावर क्लिक करावे.
- नंतर तेथे मागितलेली सर्व माहिती भरून सेंड ओटीपी या पर्यावर क्लिक करावे.
- हा ओटीपी तुमच्या रजिस्टर ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर यईल.
- ओटीपी सदर बॉक्समध्ये भरावा व लॉगिन बटनावर क्लिक करावे.
- व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर रजिस्टर ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबरवर येईल.
- त्यानंतर नवीन आधार कार्डसाठी अर्ज करावा.
- हे सर्व काम तुम्ही जवळील आधार केंद्रावर जाऊन देखील करू शकता.
आधार नंबर मिळवण्याची दुसरी पद्धत-
तुम्ही आधार नंबर हा टोल फ्री नंबरच्या मदतीने देखील मिळवू शकतात. 1947 या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करा. तेथे सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा व तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा पर्याय निवडा. यावेळी तिथला कर्मचारी तुम्हाला काही प्रश्न विचारेल. त्यांची योग्य ती उत्तरे द्या. यानंतर आधारचे डिटेल्स पाठवले जातील. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही डुप्लिकेट आधारकार्ड साठी अप्लाय करू शकता.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.