चालू घडीला आधार कार्ड हे ओळखीचे अत्यंत महत्त्वपूर्ण दस्ताऐवज बनलेले आहे. आधार कार्डचा वापर हा शासकीय योजनांसाठी ते बँकेच्या व्यवहारासाठी केला जातो. तसेच आधार कार्ड शिवाय कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही.जर आधारकार्ड वरील माहिती चुकीची असेल तर अशा नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी शासनाने आधारकार्ड वरील माहिती दुरुस्त करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया आधारकार्डच्या कोणत्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
नाव बदलण्यासाठीच्या नवीन अटी-
UIDAI ने नाव बदलण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल केलेला आहे. जर आधारकार्ड वरील नावात बदल करायचा असेल तर राजपत्र अधिसूचना सादर करणे गरजेचे आहे. तसेच नावाच्या दुरुस्तीसाठी दुसरा ओळख पुरावा देखील देणे गरजेचे आहे. यामध्ये पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सेवा ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी UIDAI ने हा निर्णय घेतलेला आहे. आधारकार्ड वरील पूर्ण नाव बदलायचे असो किंवा केवळ काही अक्षरांमध्ये सुधारणा करायची असली तरी नवीन अटी लागू होणार आहेत. यामुळे आधारकार्ड वरील नाव दुरुस्तीची प्रक्रिया अगोदर पेक्षा आता अधिक कठीण झालेली आहे.
पत्ता बदलण्याची प्रक्रिया सोपी-
नाव दुरुस्ती करण्याच्या प्रक्रिया कठोर केलेली आहे, परंतु UIDAI ने पत्ता दुरुस्त व नवीन आधार नोंदणीची प्रक्रिया मात्र सोपी केलेली आहे. बँकेच्या पासबुकचा वापर करून देखील आता पत्ता बदलता येणार आहे. यामुळे पत्ता बदलण्याची प्रक्रिया ही अधिक सोपी झालेली आहे.
नवीन नियमांचा परिणाम-
या नवीन UIDAIच्या निर्णयामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होण्यास याचा फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु ग्राहकांना यामुळे काही प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. UIDAI च्या नवीन नियमांनुसार आधारकार्ड वरील कोणत्याही दुरुस्तीसाठी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. जर असे केले नाही तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेसाठी नागरिकांनी आधीपासूनच आवश्यक कागदपत्रांची तयारी करणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा मूलभूत दस्तावेज असल्याने त्यावरील माहिती अचूक ठेवणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. UIDAIच्या नवीन नियमांमुळे नागरिकांनी सतर्क रहावे व अगोदरच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.