कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर आधार, पॅन, मतदार ओळखपत्र व पासपोर्टचे काय करावे?

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कागदपत्रांचे काय करावे? याबद्दल अनेकांना माहिती नसते. चला तर मग आज जाणून घेऊया याबद्दलची माहिती. कारण ही माहिती असेल तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यूनंतर कोणीही त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करू शकणार नाही. आज काल कोणतेही सरकारी काम करण्यासाठी किंवा इतर कोणतीही कामे करण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड अशी कागदपत्रे लागतात.

बॅंक खाते उघडण्यासाठी तसेच सर्व कामांसाठी या कागदपत्रांची गरज भासत असते. त्याचबरोबर ही कागदपत्रे तुमच्या पत्त्याचा पुरवा म्हणून देखील कामी येतात. परंतु कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर या कागदपत्रांचे काय करावे? याबद्दल अनेकांना माहितीच नसते. ते आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर कोणीही त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करु शकणार नाही.

मतदान ओळखपत्र-

मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करण्याची संधी मिळते. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही त्याचे मतदान ओळखपत्र रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म-7 भरावा लागेल व त्यानंतर हे कार्ड रद्द होईल. मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला असणे गरजेचे आहे.

आधार कार्ड-

आधार कार्ड रद्द करण्याची किंवा परत करण्याची कोणतीही सुविधा नाही. परंतु आधार कार्ड लॉक करता येते. शकता आधार कार्ड लॉक करण्यासाठी या अधिकृत वेबसाईटवर जावे. तेथे ‘माय आधार’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर ‘आधार सर्विसेस’वर क्लिक करून लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करावे. त्यानंतर तेथे 12 अंकी आधार क्रमांक व दिलेला कॅप्चा कोड टाकावा व सेंड ओटीपी या पर्यायाबर क्लिक करावे.

त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो टाकावा. त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डेटा लॉक/अनलॉक करण्याचा पर्याय दिसेल, तो तुम्ही निवडू शकता. लॉक बटनावर क्लिक केल्यास बायोमेट्रिक डेटा लॉक होईल. तसेच जर तो व्यक्ती मृत्युच्या अगोदर आधारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा किंवा सबसिडीचा लाभ घेत असेल तर संबंधित विभागाला त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती द्यावी. जेणेकरून त्या व्यक्तीचे नाव योजनेतून काढले जाईल.

पॅन कार्ड-

इन्कम टॅक्स भरण्याबरोबरच बँक व डीमॅट खाते उघडण्यासाठी सर्व कामांसाठी पॅन कार्डची गरज असते. पण पॅनकार्डधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा कुटुंबीयांनी त्याचे कार्ड परत करावे. यासाठी मृत्य व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आयकर विभागाशी संपर्क साधावा. पॅनकार्ड परत करण्याअगोदर मृत व्यक्तीची सर्व खाते दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित किंवा बंद करावीत. कारण नंतर यामुळे अडचणीचा सामना करावा लागू नये.

पासपोर्ट-

आधार कार्डप्रमाणे पासपोर्ट रद्द करण्याची कोणतीही सुविधा नाही. पासपोर्टची काल मर्यादा संपल्यानंतर ते अवैधय ठरणार आहे. अशावेळी पासपोर्टची डेडलाईन संपेपर्यंत पासपोर्ट ठेवावा, जेणेकरून तो कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडणार नाही.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *