महाराष्ट्र राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच आपणास याद्वारे समजणार आहे की पुढील पाच वर्षासाठी कोणते सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (शनिवार) 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू झालेली आहे. 288 जागांसाठी ही निवडणूक झालेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या निकालाचे प्रत्येक अपडेट कोठे पहावे याबद्दलची माहिती.
राज्यात सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांची शिवसेना, तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस यांचा समावेश आहे. मतमोजणीच्या अगोदर भारतीय निवडणूक आयोगाने(ECI) विस्तृत व्यवस्था केलेली आहे. मतदारांना आपल्या संघातील निकालाबाबत अपडेट राहण्याचे विविध मार्ग आहेत. मतमोजणी ही आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली आहे.
विविध टीव्ही चॅनेल, न्यूज वेबसाईट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा लाईव्ह व रियल- टाईम व अधिकृत अपडेटसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खालील अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेला आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघाचे ताजे अपडेट व मतदार संघनीय निकाल तुम्हाला पाहता येणार आहे. आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ऑनलाईन results.eci.gov.in या वेबसाईटवर चेक करू शकता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पहा!-
रियल टाईममध्ये रिटर्निंग ऑफिसर/ सहाय्यक रिटर्निंग ऑफिसरने प्रविष्ट केलेल्या डेटानुसार विधानसभा मतदारसंघ/ संसदीय मतदारसंघाचे नवीनतम ट्रेड व निकाल भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
मतदारसंघनिहाय निकाल कसा तपसावा?-
- ECI च्या अधिकृत वेबसाईट निकालावर क्लिक केल्यावर तुमचे राज्य कोणते आहे ते निवडा.
- त्यानंतर तुमचा मतदारसंघ तपासा.
- कोणता उमेदवार आघाडीवर आहे व कोणता पिछाडीवर आहे याची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
- निकाल लागल्यानंतर मतदारसंघनिहाय विजेते देखील यावर प्रदर्शित केले जातील.
विधानसभा निवडणूक निकाल पहा Voter Helpline अॅपवर-
मतदार मोबाईल फोनद्वारे व्होटर हेल्पलाइन अॅपवर निवडणूक निकाल पाहू शकतात. हे अॅप Android आणि iOS दोन्ही व्यापारकर्तेना वापरता येणार आहे. वोटर हेल्पलाइन अॅप गुगल प्ले किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. तसेच ॲप डाऊनलोड केल्यानंतर वापरकर्ते विजयी, आघाडीवर किंवा पिछाडीवर असलेले उमेदवारांचे तपशील आणि मतदारसंघनिहाय निकाल पाहण्यासाठी उपलब्ध फिल्टर्स वापरू शकतात.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.