सोलर पंप योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती तपासा, तसेच पेमेंट झालेले आहे की नाही हे कसे समजेल?

शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून पेमेंट भरणा करण्यासाठी मेसेज येत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी या अगोदरच पैसे भरलेले आहेत व ते पुढील प्रोसेसनुसार पात्र सुद्धा झालेले आहेत. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले नाहीत, ते लाभार्थी अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात. सदर लेखांमध्ये अर्जाची ऑनलाईन स्थिती पाहण्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा.

कारण पैसे भरल्यानंतरच तुमचा अर्ज हा पुढील कार्यवाहीसाठी सबमिट होणार आहे. जर तुमचे पेमेंट भरणे बाकी असेल तर पेमेंट करण्याबाबत मेसेज आलेला असेल. जर मेसेज आलेला असेल तर आपण तात्काळ योजनेच्या नियमानुसार मागणी पत्राच्या रकमेचा भरणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला अर्ज पूर्णपणे सादर होणार आहे.

अर्जाची सद्यास्थिती, पेमेंट झालेले आहे की नाही हे कसे समजेल?-

  • त्यासाठी सर्वात अगोदर www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
  • त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर मेनूमध्ये जाऊन लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यातील अर्जाची सद्यास्थितीयावर जायचे आहे.
  • त्यानंतर तेथे दिलेल्या Search by Beneficiary ID या पर्यायासमोरील रकान्यात आपला प्राथमिक नोंदणी क्रमांक टाकायचा आहे.
  • नंतर Search बटणावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर पुढील विंडोमध्ये आपल्याला सगळी माहिती दिसेल.
  • तसेच अर्ज Draft मध्ये आहे की सबमिट झालेला आहे, हेही दिसेल.
  • जर अर्ज ड्राफ्टमध्ये असल्यास पेमेंट बाकी असल्याचे दिसणार आहे. त्यानुसार खाली दिलेल्या Proceed Payment या बटणावर क्लिक करावे.  
  • सर्वात शेवटी आपला अर्ज पूर्ण झाल्याचे दिसेल.
  • अशा प्रकारे शेतकरी मित्रांना सोलर योजनेचा पेमेंट करण्याबाबत मेसेज आला असल्यास ही प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून घ्यावी.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *