लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! थकीत हप्ता वाटपास सुरुवात?

अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या 1 कोटी 66 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या थकीत असलेल्या हप्त्याचे वितरण होण्यास सुरू झालेले आहे  मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं की या योजनेचा निधी वितरित करण्याबाबत शासनाने मंजुरी दिली होती. या संदर्भातील शासन निर्णय देखील प्रसारित करण्यात आला होता व लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील अशी अपेक्षा होती. परंतु मागील आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवार 15 जून 2026 पासून पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

तसं पाहिलं तर ज्या महिलांना लाभार्थ्यांचे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्याचे थकीत हप्ते त्यांच्या बँक खात्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु अशा प्रकारचे कोणतेही हप्ते खात्यामध्ये जमा न करता फक्त मे महिन्याचा थकीत हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचे थकीत हप्ते येतील अशा प्रकारची माहिती सुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ते आता या सोबतच देण्यात येतील की यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागते, यासंदर्भातील माहिती आल्यानंतर ती माहिती जाणून घेऊया. परंतु आत्ता तरी मे महिन्याचा थकीत असलेला हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *