पीएम किसान योजनेचा रेगुलर हप्ता पाहिजे असेल तर या योजनेची ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. पीएम किसान योजनेची ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घरी बसल्या करू शकतात. तुमची केवायसी झालेली आहे की नाही हे कसं चेक करायच आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांनी केवायसी आपल्या मोबाईल मधून कशी करायची हे आपण आज सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Face e-KYC करण्याची पद्धत-
- सर्वात अगोदर play Store वरती जाऊन PMKISAN GOI व Aadhaar Face RD हे दोन्ही ॲप इन्स्टॉल करायचे आहेत.
- आता पीएम किसान योजनेचे जे ॲप आहे ते ओपन करून परमिशन Allow करायची आहे आणि खालील Next बटनावरती क्लिक करायचे आहे. नंतर आपली भाषा निवडून Submit बटनावरती क्लिक करायचे आहे व Ok बटनावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर Login बटनावरती क्लिक करायचे आहे.
- आता पुढे Benefiiary हा टाईप सिलेक्ट करायचा आहे व त्यामध्ये Aadhar No. सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा आहे.
- नंतर पुढे Facial EKYC Login या बटनावरती क्लिक करायचे आहे व I agree यावरती क्लिक करून Scan Face या बटणावरती क्लिक करायचे आहे.
- आता पुढे कॅमेरा चालू होईल. चेहरा व्यवस्थित ठेवा व डोळ्यांची उघडझाक करा. ऑटोमॅटिकली स्कॅन होईल व पुढे लॉगीन होईल.
- पुढे MPIN विचारलेला आहे.यामध्ये कोणतेही सहा डिजिट टाकून सबमिट करायचे आहे. हा MPIN लक्षात ठेवायचा आहे.
- त्यानंतर पुढे Dashboard वरती क्लिक करायचे आहे. तेथे तुमची माहिती येईल व तुमची केवायसी झालेली आहे की नाही हे दिसेल. जर eKyc Status: YES असे दिसत असेल तर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काहीही करण्याची गरज नाही.
- ज्या शेतकऱ्यांना आधार नंबर टाकल्यानंतर eKyc Status: No असे दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करायची आहे.
- त्यासाठी Dashboard वरती यायचं आहे तेथील eKYC for other beneficiaries या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी करायची आहे त्याचा Aadhar No. टाकून Search या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- त्यासाठी Start eKyc या बटणावरती क्लिक करावे व MPIN टाकून Submit या बटनावरती क्लिक करावे.
- आता पुढे आधार नंबर टाकलेल्या शेतकऱ्याचा चेहरा स्कॅन केला जाईल. त्यासाठी I agree या बॉक्सवरती टिक करून Scan Face या बटनावरती क्लिक करायचे आहे.
- पुढे कॅमेरा चालू होईल. चेहरा व्यवस्थित ठेवा व डोळ्यांची उघडझाक करा. अशा पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
- केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती e-KYC has been completed successfully अशी Info दिसेल. 24 तासांमध्ये केवायसी अपडेट होऊन जाईल. अशा पद्धतीने केवायसी करता येणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

