कर्जमाफी योजनेतील कर्जदार शेतकरी मयत असल्यास हे काम करा?

आता बँकांच्या माध्यमातून या वारसांच्या माहितीच्या संदर्भातील पुढील प्रक्रियेबाबत काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. वारसाचे नाव योजनेत समाविष्ट करताना खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.

1) वारसाचा विशिष्ट नमुन्यातील अर्ज, संस्थेचा ठराव.

2) कर्जदाराचे मृत्यू प्रमाणपत्र- ग्रामपंचायत/नगरपालिका/ महानगरपालिका/शासकीय वैद्यकीय अधिकारी यापैकी कोणत्याही एकाच्या सही शिक्यानिशी.

3) वारस/कुटुंब प्रमाणपत्र- ग्रामसेवक/सरपंच/तहसीलदार/ नगरसेवक/शासन नियुक्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी, सक्षम अधिकारी यापैकी कोणत्या एकाच्या सही शिक्यानिशी.

4) एकापेक्षा जास्त वारस असतील तर (वारस सज्ञान असल्यास) इतर वारसांनी एका वारसाचे नाव समाविष्ट करणे बाबत रु.100 किंवा रु. 500 च्या बॉंडवर संमतीपत्र नोटीसह ॲफेडेव्हिट करून दिल्यानंतर केवळ एकच वारसाचे नाव यादीमध्ये समाविष्ट करावे. वारस एकच असल्यास संमतीत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या प्रकारचे घोषणापत्र वारसाला द्यावे लागणार आहे.

याच्यामध्ये वारस/कुटुंबाचे प्रमाणपत्र हे या ठिकाणी सरसकट लागणार आहे आणि अशा प्रकारची जी काही कागदपत्रे असतील या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर जे शाखा तपासणीस असतील ते या वारसाचे नाव माहितीमध्ये समाविष्ट करतील. अशा प्रकारच्या सूचना आता बँकांना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या घरातील कर्जदार व्यक्ती जर मयत असेल तर सहमतीने एका वारसाचे नाव आपण या कर्ज खात्यासाठी देऊ शकता.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *