लाडकी बहीण योजना मे महिना हप्ता अपडेट?

लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भातील जीआर आलेला आहे. जीआर नक्की काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत दिनांक 10 जून 2026 रोजी जीआर काढण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि. 9/ 4/2026 रोजीच्या परिपत्रकांन्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून देण्यात आलेली आहे.

त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लेखाशीर्षाखाली माहे मे 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकातंर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. हा जीआर अनुसूचित जाती घटकांअंतर्गत देण्यात आलेला आहे.

ओपन प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा लाभ थोड्या दिवसात लवकर जमा होईल. अगोदर अनुसूचित जाती-जमाती, SC कॅटेगरीतील  महिलांना जे काही पेंडिंग हप्ते असतील किंवा येणारे हप्ते असतील ते आता लवकरच जमा होतील. ज्या ओपन कॅटेगरीमधील महिला असतील त्यांचा हप्ता थोड्या दिवसानंतर जमा होईल. येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये  हे हप्ते जमा होतील. म्हणजेच 15 जूनपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *