काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एकयत्र मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे लाभ न मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांनाअगोदर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानुसार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या कर्जमाफीसाठी लावण्यात येणाऱ्या निकषांनुसार अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत होते. परंतु अखेर वंचित राहत असलेल्या शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी तसेच मागील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमाफी योजनेत करण्यात येणार आहे. या दरम्यान 2017 आणि 2019 च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी लाभपासून वंचित होते. 2017 व 2019 च्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना पात्र नसूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता.
यंदाच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यापासून लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 2017 व 2019 च्या कर्जमाफीमध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जमाफी योजने सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या योजनेतील अटी व शर्ती काय असतील, हे पहावे लागणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

