पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता सुरू ठेवण्यासाठी 30 जून अगोदर आपली वार्षिकी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जर मुदतीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याचा मुख्य उद्देश पीएम किसान योजनेमध्ये पारदर्शकता आणणे, गळती रोखणे व केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यापर्यंतच शासनाचे अर्थसहाय्य पोहोचवणे हा आहे.
यासाठी राज्यभरामध्ये 20 मे 2026 पासून विशेष मोहीम राबवली जात आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. गाव पातळीवर याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. सध्या वार्षिकी ई-केवायसी मोहीम राबविण्यात येत आहे. 30 जून ही या प्रक्रियेची अंतिम मुदत आहे. त्यामुळे विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास येणारा हप्ता तांत्रिक कारणास्तव थांबला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
प्रमाणिकरण कसे करावे?-
- बायोमॅट्रिक पद्धत-
शेतकरी आपल्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन ई-केवायसी करू शकतात.
- फेस ऑथेंटिकेशन-
पीएम किसान मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
- दिव्यांग व वृद्ध शेतकऱ्यांसाठी घरपोच सुविधा-
ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना शारीरिक हालचालीमुळे केंद्रावर जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी शासनाने विशेष सोय केलेली आहे. नोडल अधिकारी व क्षेत्रीय गाव पातळीवरील ग्रामस्तरीय कर्मचारी अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘फेस ऑथेंटिकशन’द्वारे त्यांची ई केवायसी पूर्ण करण्यास मदत करतील. शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करावी असे देखील आवाहनन करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

