अखेर PM Kisan योजनेच्या 23 व्या हप्त्याची तारीख जाहीर?

राज्यातील पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच 23 वा हप्ता हा 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा हप्ता कधी जमा होईल, याची प्रतीक्षा शेतकरी करत होते. 30 जूनपर्यंत केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते व याच पार्श्वभूमीवरती केवायसी केलेले लाभार्थीच यामध्ये पात्र करण्यात येतील अशी अपडेट होती. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून 20 जून 2026 पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढण्यास सांगण्यात आले होते व याच पार्श्वभूमीवरती या फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.

लाभार्थी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. मागील हप्ता हा एकूण 89 लाख 66 हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला होता. आता एवढ्याच लाभार्थ्यांना या योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार की यामध्ये वाढ होईल हे पाहण्यासारखे असणार आहे. परंतु आत्ता तरी या योजनेसंदर्भात गोड बातमीचे अपडेट आलेले आहे. आता यासोबतच नमो शेतकरी योजनेचा थकीत असलेला हप्ता वितरित करण्यात यावा हीच अपेक्षा आहे. या संदर्भातील एक ते दोन दिवसांमध्ये काही अपडेट आले तर ते आपण जाणून घेऊया.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *