कर्जमाफी व पीक कर्जाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आज आपण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (21 मे) रोजी मुंबईयेथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अनेक मोठ्या घोषणा केलेले आहेत. खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्याअगोदरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावीत व कर्ज मिळावण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शासनाने बँकांना कडक निर्देश दिलेले आहेत.

30 जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होणार-

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की 30 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल. त्याचबरोबर येणाऱ्या विधानपरिषद (MLC) निवडणुकांमुळे या कर्जमाफीला कोणताही ब्रेक लागणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. हा निर्णय निवडणुकांची घोषणा होण्याअगोदरच घेण्यात आलेला आहे व या निवडणुकीचे मतदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत, शेतकरी नाहीत. त्यामुळे गरज भासल्यास सरकार या संदर्भामध्ये गरज पडल्यास निवडणूक आयोगाची रीतसर परवानगी घेईल, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

पीक कर्जाबाबत घेण्यात आलेला निर्णय-

शेतकऱ्यांसाठी या पत्रकार परिषदेतील सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय म्हणजे सिबिल (CIBIL) स्कोअ‍रच्या जाचातून मिळालेली मुक्ती हा आहे. अनेकदा सिबिल स्कोर कमी असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देत होत्या. यावरती मुख्यमंत्र्यांनी बँकांना खडे बोल सुनावलेले आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला सिबिल स्कोअरचे नियम लावून पीक कर्जापासून वंचित ठेवू नये असे स्पष्ट आदेश जाहीर करण्यातआलेले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे.

यासोबतच राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच 80 टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्ज वितरणाचे लक्ष पूर्ण करण्याची कडे निर्देश दिले गेलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2026 मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळेसच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केलेली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकृत सूत्रांनुसार साधारण 35,000 कोटी रुपयांचा एकूण खर्च लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *