राज्यामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळवा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष कर्जमाफी कधी होणार याकडे लागले होते. आता शेतकरीबांधवांसाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे. अहिल्यानगरमधील चौडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. यावेळी राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री उपस्थित होते.
तेव्हा भाषण करताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी होणार याची तारीख जाहीर केलेली आहे. ते बोलताना म्हणाले की कर्जमाफीच्या निर्णयाबाबत घोषणा करण्याचा अधिकार हा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा आहे. परंतु आज अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात या योजनेबाबत मी माहिती देणार आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने असलेल्या योजनेअंतर्गत येत्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे.
कर्जमाफीसाठी गरजेचा असलेला राज्यस्तरीय बँकर्स समितीचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे सादर होणार असल्याची माहिती काही दिवसांना अगोदर समोर आली होती. या प्रक्रियेमुळे राज्यातील 24 लाख 73 हजार 566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागांनी जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केलेली होती. संकलित माहितीनुसार कर्जमाफीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

