कर्जमाफी बद्दल दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आचारसंहितेमध्ये अडकू शकेल का? असे जेव्हा दत्तात्रय भरणे यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. शेवटी याबाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब उत्तर देतील. त्यांनी पूर्वीच कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यातला शेतकरी आज अडचणीत आहे कधी कधी पाऊस जास्त पडतो, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ होतो आणि या शेतकऱ्याला कुठेतरी मदत करण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घेतलेला आहे.

तसेच अनेक निर्णय हे शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत तरी माझा शेतकरी अडचणीत आहे. या शेतकऱ्याला कुठेतरी आर्थिक पाठिंबा व बळ मिळावे यासाठी देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे. थकबाकीदार शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचं निर्णय घेतलेला आहे. तसेच जे रेगुलर कर्ज भरत आहेत. साधारणतः तीन वर्ष ज्यांनी कर्ज काढलेले आहे, त्यांनी तीन वर्षे रेगुलर भरलेले आहेत आणि तीन वर्षांमध्ये एखाद्या वर्षात त्यांनी कर्ज घेतलच नाही परंतु पाठीमागे दोन वर्ष त्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार रुपये पर्यंत सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *