लाडक्या बहिणींना परत अर्ज करून केवायसी करता येणार का? आदिती तटकरे काय म्हणाल्या?

2 कोटी पेक्षा जास्त महिला लाभार्थी पात्र असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमधील 70 लाखापेक्षा जास्त लाभार्थी कमी होऊन 1 कोटी 68 लाख एवढी लाभार्थी संख्या झालेली आहे. याच्यामध्ये असे लाभार्थी आहेत की ज्यांनी केवायसी नाही केली, केवायसीमध्ये चुका झाल्या किंवा अपात्रतेची इतर काही कारणे असल्यामुळे बऱ्याचशा महिला लाभार्थी यामधून वगळण्यात आलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरती ज्या काही महिला लाभार्थ्यांना यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे त्यांच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

परंतु मागील दोन-तीन दिवसापासून ज्या महिला लाभार्थी या योजनेच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेल्या आहेत किंवा ज्यांना याच्यामध्ये केवायसी करता आले नाही, अशा महिला लाभार्थ्यांना जर तुमचा हप्ता बंद झालेला असेल तर एक विहित नमुन्यातील अर्ज महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात सादर करावा अशा प्रकारचे आवाहन करणारा मेसेज व्हायरल केला गेलेला आहे आणि याच अनुषंगाने ज्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत किंवा ज्या महिला लाभार्थ्यांना हप्ते आलेले नाहीत अशा महिला लाभार्थी तो अर्ज भरून कागदपत्रासह महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जात आहेत.

परंतु बहिणींनो याच संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आता आवाहन करण्यात आलेले आहे, की अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. मैत्रिणींनो एकंदरीत आपण जर पाहिल तर ज्या महिला लाभार्थी या अंतर्गत पात्र आहेत, परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या कालावधीपासून काही तांत्रिक कारणामुळे हप्ते आलेले नाहीत, त्यांच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया ही शासनाच्या माध्यमातून केली जात आहे आणि ही प्रक्रिया पार पडताच त्या महिला लाभार्थ्यांना हप्ते येणार आहेत. याचबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्याचा ज्या पात्र महिला लाभार्थ्यांचा हप्ता वितरण झालेले नाही त्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

म्हणजेच हप्ता वितरण पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना सुद्धा झालेले नाही. त्याच्यामध्ये वितरणाच्या प्रक्रिया बाकी आहेत. आता याच्या व्यतिरिक्त जे काही अपात्र करण्यात आलेले किंवा ज्यांची केवायसी झालेले नव्हती त्यांना जून 2026 नंतर केवायसी सुरू करण्यात येणार आहे. परंतु सध्या तरी आपण कागदपत्र जमा केली म्हणजे आपली केवायसी होईल व आपल्याला हप्ता सुरू होईल अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया या मध्ये राबवली जात नाही. ज्या महिला लाभार्थी यामध्ये पात्र आहेत व कोणत्याही कारणामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेले नाही, अशा महिला लाभार्थ्यांना जर हप्ता मिळालेला नसेल तर त्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांनी घाबरून जाऊ नये.

परंतु ज्या महिला लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेले आहे, त्यांना मात्र सध्या कोणतीही प्रक्रिया सुरू नाही. परंतु आपण का अपात्र करण्यात आलेलो आहोत हे तपासायचे असेल तर आपली तपासणी कार्यालयाच्या माध्यमातून करू शकता. परंतु केवायसी झालेली नाही, हप्ता बंद झालेला आहे म्हणून एक अर्ज भरून कार्यालयात जा अशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया नाही. विनाकारण वेळ वाया जाईल  मनस्ताप होईल व कोणतेही काम या ठिकाणी होणार नाही. ज्या लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्ते येत असतील व हा जर हप्ता आलेला नसेल तर थोडीशी वाट पहावी. हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

यामध्ये अनेक महिला लाभार्थी पात्र आहेत परंतु त्यांचे नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्ते आलेले नव्हते त्यांचे सुद्धा हप्ते शासनाला वितरित करावे लागणार आहेत. ते वितरित केले जातील व यासंदर्भातील प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे. काही तांत्रिक कारणामुळे हे हप्ते वितरित करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन संधी, परत संधी वगैरे असे जे काही सांगितले जात आहे याला कोणत्याही प्रकारची अधिकृत शाश्वती दिली जात नाही. त्यामुळे आपला वेळ वाया घालवू नका.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *