शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) या योजनेच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना साधारणतः 1 लाख 20 हजार रुपये ते 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान 4 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात दिले जाते. घर मंजूर झाल्यानंतर 15 हजार, पायाभरणी पूर्ण झाल्यानंतर 70 हजार व छत आणि बांधकाम प्रगतीनुसार उर्वरित हप्ते दिले जातात. जर तुमच्या घराचा हप्ता थकला असेल किंवा मिळाला नसेल तर काय करावे? हे सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
या गोष्टी तपासा-
- ग्रामपंचायत किंवा नगरपालिका संपर्क-
सर्वात आगोदर आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाशी किंवा नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करावा. हप्ता का रखडला आहे (उदा. तांत्रिक बिघड, जीओ टॅगिंग नसणे किंवा बँक खात्याची माहिती) याची माहिती घ्यावी.
- जिओ टॅगिंग (Geo-Tagging)-
घरकुलाचे काम कोणत्या टप्प्यावर आहे याचे जिओ टॅगिंग करणे गरजेचे असते. जर काम थांबले असेल किंवा तांत्रिक कारणामुळे जिओ टॅगिंग झाले नसेल तर पुढचा हप्ता येत नाही.
- बँक खात्याची तपासणी-
तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासावे. आधार लिंकिंग नसल्यामुळे पैसे जमा होत नाहीत.
- ऑनलाईन तक्रार/अर्ज-
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आता पुढील हप्ता मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही ‘महाआवास’ (MahaAwas) पोर्टल किंवा संबंधित ॲपच्या माध्यमातून ही माहिती मिळू शकतात.
- पंचायत समिती/गटविकास अधिकारी (BDO)-
ग्रामपंचायत स्तरावरती समस्या सुटली नाही तर तालुक्याच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) तक्रार अर्ज दाखल करावा.
थोडक्यात सांगायची झाली तर जर तुम्ही घरकुलाच्या कामाचे फोटो अपलोड केले नसतील किंवा तांत्रिक कारणांमुळे हप्ता अडकून राहू शकतो. त्यामुळे ग्रामसेवकाकडून ‘वर्क प्रोग्रेसची खात्री करावी.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

