मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, पशुपालक व ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियान 2026 ही नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान व आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

सदर योजना म्हणजे काय?-

ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी त्याचबरोबर पशुपालकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. पशुधनावर आधारित उद्योग उभारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शासनाने 9 मार्च 2026 च्या जीआर नुसार ही योजना राज्यभर लागू करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

सदर योजनेच्या लाभास कोण पात्र असणार?-

या योजनेमध्ये विविध पशुपालन व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रमुख लाभ:

  • 5 दुधाळ गाई किंवा म्हशी
  • 50 शेळ्या किंवा 5 बोकड
  • वराह पालन (Pig Farming)
  • 5000 पर्यंत कुक्कुट पक्षी
  • मुरघास निर्मिती संयंत्र

अलीकडेच योजनेत बदल करून शेतकरी गट, FPO व FPC यांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार?-

या योजनेची अर्ज प्रक्रिया ही 1 मे 2026 पासून MahaDBT या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामुळे अर्ज सुरू होण्याच्या अगोदर सर्व कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, रहिवासी दाखला, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, बँक लोन सँक्शन लेटर (कुक्कुटपालनासाठी)

प्रशिक्षण प्रमाणपत्र कोणाला गरजेचे?-

जर तुम्ही खालील व्यवसायासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. जसे की डेअरी व्यवसाय, शेळीपालन, वराहा पालन, कुक्कुटपालन हे प्रमाणपत्र असल्यास अर्ज मंजुरीचे शक्यता जास्त वाढते.

या योजनेचा फायदा कोणाला होणार?-

या योजनेचा फायदा विशेषतः खालील लाभार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. शेतकरी, पशुपालक, बेरोजगार ग्रामीण युवक, महिला बचत गट व FPO किंवा FPC गट

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *