छोटा गॅस सिलेंडर तिप्पट महागला?

केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी 1 मे 2026 रोजी व्यावसायिक व छोट्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ जाहीर केलेली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. याचा फटका फक्त हॉटेल व्यवसायिकांनाच नाही तर सर्वसामान्य 5 किलो छोटा सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना देखील बसणार आहे.

छोट्या सिलेंडरची किंमत किती?-

काल घेतलेल्या निर्णयानंतर आता 5 किलो छोट्या सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 261 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. मुंबई व पुणे शहरांमध्ये 30 एप्रिलपर्यंत 549 रुपये किंमत असणारा हा सिलेंडर आता तब्बल 810 रुपयांना मिळत आहे. या दरम्यान घरगुती वापरासाठी वापरला जाणारा 14.2 किलोग्राम घरगुती LPG सिलेंडर हा 913 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे आता 5 किलोग्रॅम सिलेंडर व 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडर यांच्या किमतीमध्ये फक्त 100 रुपयांचा फरक दिसून येत आहे.

छोटा सिलेंडर घरगुती गॅस पेक्षा तिप्पट महाग-

14.2 किलोग्रामचा घरगुती LPG सिलेंडर व 5 किलो छोट्या सिलेंडरच्या किमतीची तुलना केली तर लक्षात येईल की 5 किलो छोटा सिलेंडर हा तिप्पट महाग झालेला आहे. 5 किलो छोटा सिलेंडरची प्रति किलोग्राम किंमती सुमारे 162 रुपये तर घरगुती गॅस प्रति किलोग्रॅम सुमारे 62 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तसे पहायला गेले तर छोटा सिलेंडर जवळपास  तिप्पट महाग झालेला आहे.

याचा फटका कोणाला-

मार्च महिन्यामध्ये LPG  संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने छोटू सिलेंडर सहज उपलब्ध करून दिलेला होता. त्याचा वापर प्रामुख्याने मजूर व विद्यार्थी करत होते. परंतु आता यात वाढ झाल्याने शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती त्याचबरोबर कामगारांवरती याचा गंभीर परिणाम होणार आहे. 5 किलोच्या सिलेंडरच्या दरवाढीचा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती देखील मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. याशिवाय रिअल इस्टेट क्षेत्रातील बांधकाम कामगारांना  आता अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, तर बरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *