जमिनीचा खरा मालक नक्की कोण? फक्त 7/12 पाहून फसू नका?

जमीन खरेदी केलेला कागद आहे म्हणजे जमीन आपली ही सर्वसामान्य माणसाची समजूत अजूनही व्यवहारांवरती प्रभाव टाकताना दिसून येत आहे. परंतु अलीकडे सुप्रीम कोर्टने घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून हा गैरसमज दूर झालेला आहे. जमीन व्यवहार फक्त कागदांवरती नाही तर कायदेशीर दृष्ट्या निर्विवाद मालकी हक्कावरती आधारित असावेत, असा स्पष्ट संदेश न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

विक्री करार विरुद्ध मालकी हक्क-

अनेक जणांना वाटत असते की विक्री करार (Agreement to sale) झाला तर ताबा मिळाला म्हणजे मालकी मिळाली. परंतु न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट नमूद केलेले आहेत. विक्री करार हा भविष्यातील व्यवहाराची हमी हमी असतो. तो मालकी हक्क देत नाही फक्त ताबा असणे म्हणजे मालकी सिद्ध होत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की करार व ताबा म्हणजेच मालकी असे समीकरण कायद्यानुसार चुकीचे ठरते.

नोंदणीकृत विक्रीपत्र हाच अंतिम पुरावा- 

मालकी हक्क फक्त नोंदणीकृत विक्रीपत्रातून(Sale Deed) प्राप्त होतो. करार हा फक्त व्यवहाराची तयारी असते. नोंदणीकृत कागद असला तरी विक्रेत्याची मालकी वैद्य नसेल तर धोका कायम असतो. नोंदणीकृत आहे म्हणजे सुरक्षित हा समजही अनेकदा धोकादायक ठरणारा असतो.

7/12 उतारा म्हणजे मालकी नाही?-

7/12 उताऱ्यावरती नाव आहे म्हणजे जमीन आपली असते असा गैरसमज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. 7/12 हा फक्त महसूल नोंदवहीतील उतारा असतो. तो मालकी हक्काचा अंतिम पुरावा नसतो. तुमचे नाव असले तरीही कोणत्याही पक्षकारास न्यायालयामध्ये दावा करता येऊ शकतो.

मालकी साखळी तपासणी का महत्त्वाचे?-

जमीन खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मालकी इतिहास (Title Chain). किमान 20 ते 30 वर्षांचा मालकी इतिहास तपासावा. प्रत्येक व्यवहार कायदेशीर आहे का हे तपासावे. मालकी साखळी स्पष्ट नसेल तर भविष्यात वाद निर्माण होऊ शकतात.

जीपीए व्यवहार: हा शॉर्टकट की सापळा-

 जीपीए व्यवहार ‘Power Of Attorney (GPA)’ द्वारे होणारे व्यवहार अजूनही काही ठिकाणी सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून अशा व्यवहारांवरती कडक मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. GPA हा मालकी हस्तांतरणाचा पर्याय नाही. अशा व्यवहारांमुळे भविष्यात मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

जमीन खरेदी करताना काय करावे?-

किमान 20 ते 30 वर्षाची मालकी साखळी तपासावी. फक्त 7/12 उताऱ्यावरती अवलंबून राहू नये. केवळ करारावर व्यवहार पूर्ण करू नये. GPA व्यवहार टाळावेत. अनुभवी वकिलांचा कायदेशीर सल्ला घ्यावा. जमीन खरेदी हा आयुष्यातील खूप मोठा व संवेदनशील निर्णय असतो. फक्त कागद, ताबा किंवा उताऱ्यावरती विश्वास ठेवून व्यवहार करणे धोकादायक ठरते. मालकी हक्काचा ठोस, कायदेशीर व निर्विवाद पुरावा तपासल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये, हा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *