फ्री टॅबलेट योजना अर्ज प्रक्रिया 2026

महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महाज्योती संस्थेमार्फत एक अत्यंत महत्त्वाची योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व दररोज 6 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला जातो. ही सुविधा प्रामुख्याने जेईई (JEE), नीट (NEET)व एमएचटी-सीईटी (MHT-CET) यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी देण्यात येते. या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील प्रसारित करण्यात आलेला आहे. चला तर मग त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सदर योजनेची पात्रता-

  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
  • सन 2026 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभासाठी पात्र असणार आहे.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  • विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे.

सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड (पुढील व मागील बाजूसहित)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • वैध नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Ceramy Layer Certificate)
  • इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
  • दिव्यांग असल्यास दाखला
  • अनाथ असल्यास दाखला

सदर योजनेचा अर्ज कसा करावा?-

  • महाजोतीच्या www.mahajyoti.org.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन ‘Notice Board’ मधील “Application for JEE/NEET/MHT-CET-Batch- 2026-28 Training”  यावरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्जाबरोबर सर्व कागदपत्रे साक्षांकीत करून स्पष्ट Powder असे स्कॅन करून जोडावीत.

सदर योजनेचे आरक्षण-

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:-

  • इतर मागास वर्ग (OBC) – 59%
  • विमुक्त जाती – अ (VJ-A) – 10%
  • भटक्या जमाती – ब (NT-B) – 8%
  • भटक्या जमाती – क (NT-C) – 11%
  • भटक्या जमाती – ड (NT-D) – 6%
  • विशेष मागास प्रवर्ग (SBC) – 6%

सदर योजनेचे समांतर आरक्षण-

  • प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित असणार आहेत.
  • दिव्यांगांसाठी 4% जागा आरक्षित असणार आहेत.
  • अनाथांसाठी 1% जागा आरक्षित असणार आहेत.

सदर योजनेच्या अटी व शर्ती-

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ही दिनांक 30/05/2026 आहे.
  • पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांच्याकडे राहणार आहेत.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे बंधनकारक आहे.
  • सदर प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11 वी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य आहे. जे विद्यार्थी सदरचे कागदपत्रे सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द केली जाणार आहे.
  • कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द केली जाणार आहे.
  • अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास फक्त महाज्योतीच्या कॉल सेंटरवरती संपर्क करावा. संपर्क क्रमांकः 0712-2870120/21

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *