शासन देत आहे 90% सबसिडी; सौर पंपासाठी अर्ज सुरू!

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज कपातीच्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. तसेच दिवसा सहज व सुरक्षित सिंचन योजनेचा लाभ घेता येत आहे. या अगोदर कृषी पंपांना वीज नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जाऊन पाणी द्यावे लागत होते. परंतु सौर कृषी पंप योजनेमुळे ही समस्या कायमची दूर झालेली आहे. विशेष म्हणजे, एकदा सौर पंप बसविल्यानंतर वीज बिलाची चिंता पूर्णपणे संपणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सौर पंपाच्या किमतीवर तब्बल 90 ते 95 टक्के अनुदान देण्यात येते.

त्यामुळे अत्यल्प खर्चात शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर डिझेलवरील खर्चही वाचणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बचत होणार आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जाऊन ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पंप असल्यामुळे प्रदूषणात घट होते तसेच पर्यावरण संरक्षणाला ही चालना मिळणार आहे. ज्यांच्याकडे विहीर किंवा बोअरवेल सारखा शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, ज्यांच्याकडे अद्याप वीज कनेक्शन नाही व ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केलेला असून कनेक्शन मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जातो.

सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-

  • 7/12 व 8 अ उतारा
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक
  • आधारशी लिंक मोबाईल नंबर
  • शेताच्या क्षेत्रानुसार 3 एचपी, 5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचे सौर पंप उपलब्ध करून दिले जातात.

नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *