महाराष्ट्र राज्य शासनाने फ्लॅटधारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ (Vertical Property Card) नियमांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे आता प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र मालकी हक्काचे कार्ड देण्यात येणार आहे. हा डिजिटल पुरावा जमिनीच्या नोंदीशी थेट जोडण्यात येणार आहे. त्यामुळे 7/12 उताऱ्यावरही फ्लॅटधारकाचे नाव दिसेल.
महत्त्वाच्या बाबी-
- इमारतीतील प्रत्येक फ्लॅट किंवा व्यावसायिक गाळ्यासाठी स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.
- या कार्डमध्ये डिजिटल स्वाक्षरी व क्यूआर कोड असणार आहे.
- या कार्डवर जमिनीतील हिस्से व चटई क्षेत्र स्पष्ट असल्यामुळे फसवणुकीचा धोका टळणार आहे.
- हे कार्ड डिजिटल स्वरूपात असल्यामुळे ते सातबारा उताऱ्याच्या धर्तीवर काम करणार आहे.
- फ्लॅटधारकाचे नाव आता इमारतीखालील जमिनीच्या रेकॉर्डमध्ये (7/12) स्पष्ट नमूद केले जाणार आहे.
- फ्लॅट व भूखंडधारकांचा वार्षिक अकृषक (NA) कर रद्द करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
- महाराष्ट्र हे असे कार्ड लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. याचा फायदा मुख्यतः मुंबई, पुणे व ठाणे यांसारख्या शहरातील बहुमजली इमारतीमधील लाखो फ्लॅट धारकांना होणार आहे.
- या निर्णयामुळे फ्लॅटच्या खरेदी विक्रीत पारदर्शकता येणार आहे व जमिनीच्या मालकी हक्का बाबतची गुंतागुंती कमी होण्यास मदत मिळणार आहे.
नो- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

