पीक विम्याचे पैसे आले की नाही पोर्टलच्या माध्यमातून चेक कसे करावे?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PMFBY) रकमेचे तपशील पोर्टलवरती दिसत आहे. जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज भरला असेल व तुमच्या जवळच्या कृषी विभागाकडून पैसे आले आहेत अशी माहिती देण्यात आलेली असेल तर तुम्ही स्वतः चेक करू शकतात. ते कसे चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया. काही दिवसांअगोदर राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप 2024 व रब्बी 2025 या वर्षाचे पीक विम्याचे पैसे वितरणासाठी निधी देण्यात आला होता. याबाबतचा एक शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला होता. यातीलच लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या पिकांसाठी किती विमा भरला होता आणि तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे, हे तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तपासू शकता. यामध्ये तुम्हाला नुकसानीची टक्केवारी व तुम्हाला मिळणारे एकूण विम्याची रक्कम पाहता येणार आहे.

पीक विम्याची पैसे आले की नाही चेक कसे करावे?-

  • PMFBY च्या अधिकृत वेबसाईटवरती जावे.
  • तेथील मुख्यपृष्ठावरील ‘Application Status’ म्हणजे अर्जाची स्थिती या पर्यावरती क्लिक करायचे आहे.
  • तुमचा ‘Receipt Number’ म्हणजेच पावती क्रमांक व दिलेला कॅप्चा कोड टाकावा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती व विम्याचे पैसे मंजूर झालेले आहेत की नाही हे समजेल.

तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार कार्डचा वापर करून देखील स्थिती तपासू शकता. काही सेवांमध्ये लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी ‘Check Beneficiary Status’ च्या माध्यमातून आधार नंबर टाकण्याची सुविधा असते. जर तुम्हाला काही समस्या येत असेल तर तुम्ही हेल्पलाइन नंबर 14447 किंवा 1800-103-5490 या नंबर वरती कॉल करू शकता.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *