रेशनकार्ड धारकांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. यानुसार रेशन दुकानदारांना एकाच महिन्यात तिप्पट धान्य देण्यात येणार आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे धान्य एप्रिलमध्येच वितरित केले जाणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने धान्य घेण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जाण्याची गरज भासणार नाही. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचाही घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धान्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत पाड पडावी, यासाठी सर्व रेशन दुकानदारांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. पण धान्याच्या उपलब्धतेनुसार धान्य वितरित करण्यात येणार आहे.
कोणत्या रेशन कार्डधारकांना दिलासा?-
यामध्ये अंत्योदय अन्न योजने (एएवाय) अंतर्गत येणारे अत्यंत गरीब कुटुंब तसेच प्राधान्य गट (पीएचएच) यामधील लाभार्थी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या दोन्ही गटांतील नागरिकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे धान्य एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहे.
कोणते धान्य किती किलो मिळणार?-
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती, प्रति महिना पाच किलो धान्य दिले जाते. त्यामुळे तीन महिन्यासाठी एकूण 15 किलो प्रति व्यक्ती धान्य देण्यात येणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कुटुंब प्रति महिना 35 किलो धान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे तीन महिन्यासाठी एकूण 105 किलो प्रति कुटुंब धान्य दिले जाणार आहे. यामध्ये तांदूळ व गहू यांचा समावेश असणार आहे.
कशामुळे घेतला निर्णय?-
कडक उन्हाळा असल्यामुळे नागरिकांना वारंवार रेशन दुकानांमध्ये जायला लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विशेषता ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील लाभार्थ्यांना उन्हातान्हात होणारा त्रास टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे. तसेच पुढील काही काळ केंद्र सरकार नवीन गहू व तांदूळ खरेदी करणार आहे. त्यामुळे गोदामामध्ये नवीन खरेदी केलेले धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
अंगठ्याशिवाय रेशन नाही-
राज्यातील रेशन वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पडताळणी सक्तीची केलेली आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य घेण्यासाठी अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

