लाडक्या बहिणींना आदिती तटकरे यांनी दिला महत्त्वाचा सल्ला?

लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना कराव्या लागत असलेल्या ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ई केवायसी (E-KYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यासाठी महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. परंतु E- KYC करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाड देण्यात आलेली आहे.

या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थ्याची गरज नसून महिला मोबाईल वरून स्वतः ई-केवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. अनेक महिलांना ई-केवायसीतील तांत्रिक अडचणीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे याआधी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसीत सुधारणा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील उद्भवलेल्या अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट राज्यातील लाडक्या बहिणींकडून करण्यात आलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

नोट– महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *