संपूर्ण राज्यांमध्ये उन्हाळी हंगाम 2025-26 साठी दिनांक 8 एप्रिल 2026 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे. दिनांक 8 एप्रिल 2026 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये उन्हाळी हंगाम 2025-26 डिजिटल क्रॉप सर्वे पीक पाहणी सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंद केली जाणार आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उन्हाळी हंगाम 2025-26 साठी कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
हंगाम-उन्हाळी–
- शेतकरी स्तरावरील पिक पाहणी कालावधी: 8 एप्रिल 2026 ते 24 मे 2026
- सहायक स्तरावरील पीक पाहणी कालावधी: 25 मे 2026 ते 8 जुलै 2026
डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत 100% ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे. उन्हाळी हंगाम शेतात उभे असलेले पीक, कायम पड अथवा चालू पडलेल्या जमिनींची नोंद करणे गरजेचे आहे. तरी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी न केलेल्या सर्व शेतजमिनींची 100% ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सहायक स्तरावरून पूर्ण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तरी उपरोक्त प्रमाणे सूचना आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी व सहायक यांना देण्यात याव्यात ही विनंती. असे पत्र निलप्रसाद चव्हाण उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प, महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे) यांनी काढले आहे.
नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

