रेशन कार्डवरील रॉकेल वाटपाचे दर जाहीर? महत्त्वाची अपडेट. 

शिधापत्रिकेच्या अंतर्गत रॉकेल वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 4 हजार लिटर रॉकेलचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.

जिल्हानिहाय कोटा निश्चित-

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तालुकानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये बारामती तालुक्याला सर्वाधिक म्हणजेच 33 हजार लिटर रॉकेल देण्यात येणार आहे, तर इंदापूर तालुक्यासाठी 27 हजार लिटरचा रॉकेल पुरवठा केला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांची संख्या लक्षात घेता हा कोटा ठरवण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिलेली आहे. ग्रामीण भागालाच प्राधान्य- उपलब्ध कोट्याची मर्यादा लक्षात घेऊन नगरपालिका क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे फक्त ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच रॉकेलचा लाभ देण्यात येणार आहे. शहरांमध्ये पर्यायी साधनांची उपलब्धता लक्षात घेऊन ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून कोटा-

केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यासाठी एकूण 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलचा कोटा मंजूर करण्यात आलेला आहे. या कोट्याच्या माध्यमातून अंतोदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना रॉकेल वितरण करण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मिळालेला कोटा कमी असल्यामुळे वितरणाची व्याप्ती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे.

फक्त अंत्योदय लाभार्थ्यांनाच फायदा-

सध्याच्या परिस्थितीत सर्व लाभार्थ्यांना रॉकेल देणे शक्य नसल्यामुळे फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु गरजू कुटुंबांना प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रॉकेलचे दर काय असणार?-

रॉकेलची विक्री ही शिधापत्रिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कमिशनसह सुमारे 62 रुपये प्रति लिटर या दराने रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रॉकेल पुरवठ्यासाठी जिल्ह्यामध्ये तीन घाऊक विक्रेत्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे.

वितरणाची प्रक्रिया सुरू-

तालुकानिहाय कोटा निश्चित केल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये रॉकेलची वितरण सुरू होणार आहे. दुकानदारांना सोमवारपासून विक्री सुरू करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *